मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 16 जानेवारी 2022 (16:16 IST)

कोरोनामध्ये या 3 Vitamins चे सेवन जरूर करा, Immunity मजबूत करण्यासाठी आवश्यक

कोरोनाच्या काळात स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध असलेले अन्न सेवन केले पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि झिंक सर्वात महत्वाचे आहेत. झिंक रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, हृदय, त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी झिंक देखील आवश्यक आहे. त्याच वेळी, व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि शरीर कोणत्याही संसर्गाशी लढण्यासाठी तयार राहतं. व्हिटॅमिन सीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील विषारी आणि हानिकारक पदार्थ नष्ट होतात. व्हिटॅमिन डी आपल्या शरीरातील हाडे मजबूत करतं. व्हिटॅमिन डी शरीरात कॅल्शियम पोहोचवण्यास देखील मदत करते. व्हिटॅमिन डी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतं. या नैसर्गिक पदार्थांनी तुम्ही व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि झिंकची कमतरता भरून काढू शकता.
 
1- व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ- आवळा हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. फळांमध्ये तुम्ही किवी, संत्रा, पेरू, पपई, स्ट्रॉबेरी आणि अननस खाऊ शकता. भाज्यांमध्ये, ब्रोकोली, लिंबू, बटाटा आणि टोमॅटोमधून तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळू शकते.
 
2- व्हिटॅमिन डी समृद्ध अन्न- व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम आणि नैसर्गिक स्त्रोत म्हणजे सूर्यप्रकाश. तुम्ही दररोज सकाळी सुमारे 15 मिनिटे सूर्यप्रकाश घ्यावा. सकाळी 11 वाजेपर्यंत सूर्यप्रकाशामुळे शरीरात व्हिटॅमिन डी तयार होते. याशिवाय अंडी, मशरूम, गाईचे दूध, दही, मासे आणि संत्री व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करू शकतात.
 
3- झिंकयुक्त पदार्थ- बहुतेक लोक झिंकची कमतरता पूर्ण करण्यासाठी औषधे घेतात. पण पदार्थांमध्ये काजू, अंडी, शेंगदाणे, तीळ, टरबूज आणि सोयाबीनचे सेवन करून तुम्ही शरीरातील झिंकची कमतरता पूर्ण करू शकता. झिंक रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते.