सोमवार, 14 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (11:44 IST)

घसा खवखवत असेल किंवा दुखत असेल तर हे घरगुती उपाय करा

बदलत्या ऋतूमध्ये घसादुखी आणि घसा खवखवणे अशा समस्या कोणत्याही व्यक्तीला होऊ शकते. अनेक वेळा इन्फेक्शनची समस्या देखील उद्भवते. त्याचबरोबर हिवाळ्यात स्वतःची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत सर्दी होणे आता सामान्य झाले आहे. अशा परिस्थितीत घशाच्या संसर्गाच्या समस्येवर मात करण्यासाठी घरगुती उपायांची मदत घ्यावी. घरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा वापर करून तुम्ही घशाची समस्या चुटकीसरशी दूर करू शकता. चला तर मग जाणून घेऊया अशा गोष्टींबद्दल ज्या तुम्हाला घशातील खवखव दूर करण्यास मदत करू शकतात.
 
काढा प्या- काढा शरीरासाठी खूप फायदेशीर पदार्थ आहे. याच्या रोजच्या सेवनाने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. घशातील संसर्ग दूर करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. यासोबतच याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.
 
मध आणि काळी मिरी- मध अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून काम करतं. घसा खवखवणे आणि कोणताही संसर्ग दूर करण्यासाठी हे कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही. घशाचा संसर्ग दूर करण्यासाठी चिमूटभर काळी मिरी पावडर एक चमचा मधात मिसळून घेतल्यास संसर्गापासून मुक्ती मिळते.
 
हळद आणि दूध- घसादुखी दूर करण्यासाठी हळदीचा वापर रामबाण उपाय मानला जातो. दुधात चिमूटभर हळद घालून सेवन केल्याने घशाची समस्या लगेच दूर होते.