1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (23:24 IST)

एकदम सादे सोपे घरगुती उपाय

very simple home remedy
टोमॅटोची पेस्ट करून त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहरा ताजेतवानं दिसतो. मुरूम, सुरकुत्या, काळे डाग दूर होण्यास मदत मिळते.
 
उन्हाळ्यात जर घाम जास्त येत असेल तर पाण्यात तुरटी घालून अंघोळ केली पाहिजे.
 
रात्री झोप नसेल लागत तर झोपताना पायांना सरसोच्या तेलाची मालीश करून झोपायला पाहिजे, लगेचच झोप येते.
 
एक कप गुलाब पाण्यात अर्ध लिंबाचे रस टाकून त्याचे सकाळ-संध्याकाळ चूळ भरल्याने तोंडातील दुर्गंधी दूर होऊन हिरड्या व दात मजबूत होतात.
 
जेवणात दर रोज 2 केळी घेतली तर भुकेत वाढ होते.
 
आवळा भाजून खाल्ल्याने खोकलात लेगच आराम पडतो.
 
1 चमचा साजुक तुपात हिंग घालून प्यायलाने पोटदुखीत आराम मिळतो.