शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जुलै 2021 (00:02 IST)

पावसाळ्यात यापासून राहा दूर

कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू झाला की तन आणि मन दोन्ही ताजेतवाने होऊन जातात. पण पावसाळा एकटाच येत नसून आपल्याबरोबर आणतो खूप सारे आजार. म्हणूनच जर आपल्याला चटर-पटर खाण्याची सवय असली तरी पावसाळ्यात या गोष्टींपासून लांब राहणच बरं. या दिवसांमध्ये पोट नाजुक होऊन जातं ज्याने जेवण नीट पचत नाही आणि बाजारातील फास्ट फूड खाल्ल्याने आजार पसरण्याची भीती वाढते. शक्योतर पावसाळ्यात या गोष्टींपासून लांब राहा:
 
भजी: पावसाचे थेंब आले की गरमागरम भजी आणि चहा आठवतो. तेलात तळलेली भजी पचवण्यासाठी कठीण असतात ज्याने आपले पोट खराब होऊ शकतं म्हणून पावसाळ्यात बाजारातील भजी खाणं टाळा.
 
चाट: चटकारे घेऊन चाट खायला कोणाला आवडतं नाही. प्रत्येक गल्लीच्या कोपर्‍याला लागणारे चाटचे ठेले आकर्षित करतात पण हे बनविण्यासाठी वापरले जाणारे पाणी, चटणी आणि बटाटे आपल्या तब्येती वर वार करू शकतात.
 
पाणी पुरी: या दिवसांमध्ये पाणी पुरी मुळीच खाऊ नये. यात वापरण्यात येणार्‍या पाण्यात भरपूर जिवाणू असतात. ज्याने आपल्याला उलट्या, अतिसार, पोटातील वेदना, भूक न लागणे, आणि टायफॉइड सारखे रोग होऊ शकतात.
 
चायनीज फूड: रस्त्याचा बाजूला लागणारे चायनीज फूडचे ठेले आपल्याला स्वस्त डिश सर्व्ह करत असले तरी ते नूडल्स किंवा राईस उकळवण्यासाठी वापरण्यात येणारं पाणी घाण असतं.  यात घातले जाणारे तेल, अजीनोमोटो आणि सॉसेस आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
 
कच्ची कोशिंबीर: या दिवसात हिरव्या पालेभाज्या कोशिंबीरमध्ये घालू नये. यात सूक्ष्म कीट असतात. हे खाण्याने पोटाचा संसर्ग होऊ शकतो.
 
फळांचा रस: ज्यूस पिणं आरोग्यासाठी चांगलं असलं तरी या दिवसात फळ लवकर खराब होतात म्हणून बाजारात ज्यूस पिणे टाळा आणि आधीपासून कापून ठेवलेले फळं ही खाऊ नका. कापून ठेवलेली उघड्यावरची फळे खाल्ल्याने जुलाब व संक्रमण होण्याची शक्यता असते.