शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 19 जुलै 2021 (21:59 IST)

वेगाने चालल्याने दूर होऊ शकते नैराश्य!

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव अनेकांच्या जीवनात येत आहे. त्यातून अनेक लोक डिप्रेशन म्हणजेच नैराश्याच्या आहारी जात आहेत. यावर एक चांगला उपाय म्हणजे वेगाने चालणे. वेगाने चाल्लयाने माणसाचे नैराश्य दूर होऊ शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे.
 
स्कॉटलंडमध्ये याबाबतचे संशोधन झाले आहे. त्यात असे आढळले आहे की, वेगाने चालण्याची सवय लावून घेतली तर नैराश्यातून मुक्तता होऊ शकते. मोठ्या शारीरिक व्यायामाने नैराश्यातून सुटका होऊ शकते हे यापूर्वीही माहिती झाले होते, पण चालण्यासारख्या सोप्या व सहज व्यायामातूनही ही बाब साध्य होऊ शकते, हे आता आढळून आले आहे. 'मेंटर हेल्थ अँड फिजिकल अॅक्टिव्हीटी' या नियतकालिकात अशा संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, दहापैकी एक व्यक्ती कधी तरी नैराश्याच्या गर्तेत सापडलेली असते. त्यावर डॉक्टरांकडून औषधोपचार होत असतात. मात्र चालणे-फिरणे किंवा व्यायामाचाही यासाठी तितकाच लाभ होत असतो. फिरण्याच्या व्यायामात खर्च काहीच नसतो. तसेच आपल्या दैनंदिन क्रियेत त्याला समाविष्ट केले जाऊ शकते. फिरत असताना लक्ष अन्य गोष्टींकडे जात असल्याने मनावरील ताण दूर होण्यासाठी मदत मिळते. तसेच तणावामुळे शरीरात जे हानीकारक घटक जमा होत असतात ते व्यायामामुळे दूर होतात.