मंगळवार, 1 एप्रिल 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (01:05 IST)

Omicron आणि प्रदूषण पासून आपल्या फुफ्फुसांची काळजी कशी घ्यावी

pollution
ओमिक्रॉनच्या बाबतीत केवळ सौम्य श्रेणीतील संक्रमित रुग्णांवर वायू प्रदूषणाचा परिणाम त्यांना गंभीर आजार देऊ शकतो. सध्या खराब हवामान आणि सर्दी-खोकला सारख्या आजारामुळे ओमिक्रॉन संसर्ग अधिक वेगाने पसरण्याची शक्यता वाढते. 

दिल्ली आणि आसपासच्या भागात खराब हवामानामुळे वायू प्रदूषणाची स्थिती गंभीर स्थितीचा थेट परिणाम फुफ्फुसांवर होतो. अशात ओमिक्रॉनचा हल्ला प्रकृती अधिक गंभीर करु शकतो. अशात सल्ला दिला जात आहे की बाहेर जाणे टाळावे.
 
प्रदूषणामुळे हवा आणखीनच विषारी होत असून अशात रोगाचे विषाणू हवेत बराच काळ राहतात. प्रदूषण आणि कोविड-19 मुळे शरीरात आणखी समस्या वाढू शकतात.
 
प्रदूषणामुळे पेशींनाही धोका निर्माण होऊन कोविड-19 सोबत प्रदूषणाच्या विळख्यात असणार्‍यांना या संसर्गाशी लढण्यासाठी पांढऱ्या रक्त पेशी तयार होण्यास बराच वेळ लागेल.
 
प्रदुषणा आणि कोविड -19 च्या विषाणूमुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि त्याचा थेट परिणाम लंग्सवर होतो. छातीत ब्लॉकेजची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत कोविड-19 प्राणघातक ठरू शकतो.