शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (23:28 IST)

Covid-19 मधून बरे झाल्यानंतर या गोष्टी लगेच बदलतात

brush
Covid-19: कोविड-19 मधून बरे झाल्यानंतर काही बदल करणे गरजेचे आहे ज्याने हा विषाणू तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला पुन्हा लागू नये-
 
टूथब्रश बदला- संसर्ग बरा झाल्यावर लगेच टूथब्रश बदला नाहीतर हे हानिकारक ठरू शकते. हे इतरांसाठीही धोकादायक ठरु शकते. कोरोना विषाणू प्लास्टिकच्या पृष्ठभागावर दीर्घकाळ टिकू शकतो त्यामुळे जुना टूथब्रश फेकून द्यावा. 
 
टूथब्रश व्यतिरिक्त या गोष्टी देखील बदलणे गरजेचे आहे जसे टंग क्लीनर, जुना टॉवेल, रुमाल तसचे तेव्हा हात लावलेल्या इतर वस्तू देखील वापरू नका.
 
आपण तोंडासंबंधी सर्व वस्तू बदलणे योग्य ठरेल. कारण लक्षात ठेवा की कोरोना संसर्ग टाळण्यासाठी तोंडी स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे.