Dharma Sangrah
✕

Ear Infection In Rainy Season : पावसाळ्यात कानाच्या आजारापासून कसं वाचावं जाणून घ्या

Updated: बुधवार, 15 जुलै 2020 (12:05 IST)
1 बाह्य कान, 2 मध्य कान, 3 अंत:कान. 
अंत: म्हणजे आतील कानात काही विकार आल्यास प्रामुख्याने चक्कर येणे, चालायला त्रास होणं किंवा उलट्या होणं किंवा मळमळणं आणि कानात वेगवेगळ्या आवाज येणं सारखे लक्षणे उद्भवतात.

कानाचे प्रत्येक अवयव व्यवस्थितरीत्या काम केल्याने माणूस ऐकू शकतो. या अवयवांमध्ये कानाच्या पडद्यापासून मध्य कान आणि अंत:कानाच्या अवयवांमध्ये विकार आल्यावर वेगवेगळ्या प्रकाराची श्रवणहीनता होते. 

साधारपणे कानातून पस आल्याचे कोणी गाम्भीर्यपणाने घेत नाही. असे करू नये. ह्याचे गांभीर्य जाणून योग्य आणि तज्ञ चिकित्सकांच्या सल्ला घ्यावा नाही तर कधी कधी मेंदू ज्वर आणि मेंदूच्या एका विशिष्ट प्रकाराच्या कर्करोगासारखे गंभीर आजार उद्भवू शकतात.

कानात पस कोणत्याही वयात येऊ शकतं. पण बहुधा हे एका वर्षापेक्षा जास्त लहान बाळ किंवा अश्या मुलांना होऊ शकतं जे जास्त काळ आपल्या आईच्या कुशीतच बसतात. म्हणजे जे बसू शकत नाही, कूस बदलता येत नसे, म्हणजे अगदी तान्हे बाळ असतात. कानातून पस येणाचे उगम स्थान मध्य कानाचे संसर्ग आहेत.

मध्य कानात सूज येऊन पिकून पडदा फाटून पस येऊ लागतो. मध्य कानात संसर्ग होण्याचे तीन मार्ग आहेत, ज्यामध्ये 80 -90 टक्के कारणीभूत घसा आणि कान जोडणारी नळी आहे. या मुळे नाक, कान आणि घश्याच्या साधारण सर्दी पडसं, टॉन्सिलायटिस, खोकला या कारणांमुळे मध्य कानात संसर्ग होतो.
 
लहानग्या बाळांच्या गळ्या ते कानाला जोडणारी नळी लहान किंवा रुंद असल्याने, दूध पाजणाऱ्या मातांना नेहमी बाळाला मांडीवर घेउन दूध पाजताना बाळांच्या डोक्याखाली हात लावायला पाहिजे. अश्या माता जे आपल्या बाळाला झोपून दूध पाजतात, त्यांच्या बाळाच्या कानात पस होण्याचा त्रास उद्भवण्याची दाट शक्यता असते.
 
आयुर्वेदाच्या दृष्टीकोणातून सर्दी पडसं झाल्यास तर खालील उपाय करावे. मोहरीचे तेल गरम करून पोट, पाठ, छाती चेहरा, डोक्याला लावून सकाळ संध्याकाळ मॉलिश करावी.

जगभरात कोट्यवधी लोकं असे सापडतात जे बहिरे आहे. कमी ऐकू येणे किंवा अजिबातच ऐकायला येत नसणे याला बहिरेपणा म्हटलं जातं. ह्याची सुरुवात अगदी हळुवारपणाने होते नंतर त्रास वाढू लागतो. आपणास एखाद्या माणसाच्या जोरात बोलणं ऐकण्यासाठी फार धडपड करावी लागत असल्यास, आपल्याला ऐकण्याचा त्रास उद्भवू शकतो. 
 
सल्ला आपल्यासाठी -
* जर आपल्याला ऐकू येणं कमी झाले असल्यास किंवा कानात काही संसर्ग झाले असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* मोठ्या आवाजात सतत इयरफोनने संगीत ऐकू नये.
* घरातच कान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नये. हे एखाद्या विशेषज्ञ कडूनच करवून घ्यावं.
* कानात हेयरक्लिप, सेफ्टीपिन, काडेपेटी किंवा तीक्ष्ण वस्तू घालणे टाळा, अश्याने आपला कानाचा पडदा देखील फाटू शकतो.
* चिकित्सकांच्या सल्ला घेतल्याशिवाय वेदनाशामक, किंवा अँटिबायोटिक्स औषधांचे सेवन करू नये.
* प्रेशर हार्न वापरू नये.
* जोराचा आवाज टाळणे शक्य नसल्यास कानात कापूस घाला.
* कमी ऐकू येत असल्यास ऑडीयोमेट्री तपासणी करा.
* वाहनं चालविताना मोबाईल वापरू नये.
* रात्री शक्यतो इयरफोनचा वापर टाळा.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख