हृदयविकार टायाळचा असेल तर आठवड्यात १२ अंडी खा
अंडी आरोग्यासाठी लाभदायकच असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. आठवड्यात तब्बल १२ अंड्यांचे सेवन केल्यास ह्रद्यरोग टाळता येऊ शकतो, असा निष्कर्ष या अभ्यासात काढण्यात आला आहे. दररोज दोन अंडी खाल्याने ह्रद्यविकार, मधुमेह अशा आजारांपासून दूर राहता येणार असल्याचे ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातील संशोधकांनी स्पष्ट केले.
अंड्यामध्ये प्रथिने आणि पोषक घटक अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे अंडे हे आरोग्यास उत्तम असल्याचे मानले जाते. मात्र त्याचे अधिक सेवन केल्यास ते शरीरास घातक असल्याचे म्हटले जाते. परंतु, अभ्यासात असे आढळून आले की, दररोज दोन अंडी खाल्याने ह्रद्यविकार टाळता येऊ शकतो. यामध्ये मधुमेह, ह्रद्यविकार, डोळ्यांचे आजार टाळता येतो. त्याचबरोबर निरोगी गर्भधारणा आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठीही अंड्यांचा उपयोग होतो, असे ‘अमेरिकी जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन’मध्ये लिहिण्यात आले आहे.