शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

माझी काय चुक

नवीन नवीन लग्न झाले होते. सासूबाईंनी माझे प्रताप बघून मला स्वयंपाकघरात प्रयोग करण्यापासून मज्जाव केला होता. पण स्वयंपाकघरात माझी सतत लुडबुड चालू होती. सासूबाईं खजुराची चटणी बनवणार होत्या. माझी धडपड बघून त्यांनी माझ्याकडे काम सोपवलं. "खजुराच्या बिया काढून दे" म्हणत खजुराची डिश माझ्याकडे दिली. 
 
मी मस्तपैकी हॉलमध्ये ठाण मांडून एकेक बी काढत बसले. थोड्या वेळाने डिश घेऊन किचनमध्ये गेले. सासूबाईंच्या हातात प्लेट दिली. डोळे विस्फारून डिशमधल्या बिया बघत म्हणाल्या, "बिया??" 
"तुम्हीच म्हणाल्या ना, बिया काढून दे म्हणून?"
"आणि खजूर??"
असं म्हणताच मी एक मोठ्ठी ढेकर दिली. 
आता सांगा, यात माझी तरी काय चूक??
 
-एक सासुरवाशीण