Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बॅकसीट

Updated: मंगळवार, 30 जानेवारी 2018 (17:15 IST)
तेच जर सोबत मित्र असतील तर फुल्ल मस्ती... 
तेच जर कोणी खास असेल तर साधा खडासुद्धा लागू देत नाहीत  
अन् एकटे असल्यावर तर वार्यावर स्वार... 
 
बघा ड्राईव्हर तुम्हीच पण तुमची बॅकसीट ठरवते तुम्ही गाडी कशी चालवणार ते....  
 
आहे की नाही गंमत...! 
 
आयुष्यपण असेच असते... 
 
बघा हं...
 
तुमची गाडी म्हणजे तुमचं आयुष्य, तिचे ड्राईव्हर अर्थात तुम्ही स्वतः आणि तुमच्यावर जीव टाकणारी व तुमच्यावर अवलंबून असणारी माणसं हीच तुमची    बॅकसीट...यामध्ये तुमचे आई-बाबा, ताई-दादा, नवरा/बायको-मुलं असे सर्व...
 
तुम्ही एक जरी योग्य किंवा चूकीचा निर्णय घेतला तर त्याचा आनंद किंवा त्रास हा तुमच्या बॅकसीटला १००% होणार म्हणजे होणारच...
 
तुमची व्यसने, चुकीचे मित्र   तुमच्या  बॅकसीटला चार-चौघात मान खाली घालायला लावतात... 
 
तेच जर तुम्ही एखादं चांगलं काम केलंत तर तुमच्या बॅकसीटच्या आनंदाला पारावार उरत नाही...
 
अहो अपघाताला ड्राईव्हरच जबाबदार असतो हो पण बॅकसीट वरचे मात्र फुकटच जखमी होतात... लक्षात येतय ना...?
 
आता तुमच्या आयुष्याच्या गाडीचं बॅकसीट पहा व एक छानसं Destination ठरवा... चांगले मित्र-मैत्रीण निवडा... मग बघा कसे अगदी सुखरुप पोहोचाल... 
 
एकच विनंती - तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या गाडीला टर्न द्यायचा असेल , यु-टर्न द्यायचा असेल किंवा अगदी स्टंटच करावा वाटत असेल तेव्हा किमान एकदा तरी आपल्या बॅकसीटचा विचार करुन मगच काय करायचं ते ठरवा... 

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

'दीप अमावस्या' विशेष या मंदिरांमध्ये दीपमाळा प्रज्वलित केल्या जातात, दर्शनाने मिळते अलौकिक सौख्य

उच्च न्यायालयाने गुगल आणि मेटासह या प्लॅटफॉर्म्सना तब्बूची प्रतिमा, आवाज आणि नावाचा गैरवापर करण्यापासून रोखण्याचे आदेश दिले

अभिनेत्री माधुरी दीक्षित करणार KBC मराठीचे सूत्रसंचालन; टेलिव्हिजनवर दमदार पुनरागमन

अभिनेते परेश रावल तुकाराम मुंडेंच्या समर्थनार्थ पुढे आले; बदली दरम्यान मुख्यमंत्रीं कडे ही मागणी केली

दीपिका पदुकोण आठ महिन्यांची गरोदर असतानाही 'राका' चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे

पुढील लेख
Show comments