सासूने (वैतागुन) केलेली कविता
बंद कर तुझी चाल
पहीलं तुझं वाॅटसप चुली मंधी जाळ
रोज नविन नविन ड्रेस
नवं काढतीस फोटू
रडून रडून उपाशिच
झोपून घेतो छोटू
डिपी का फीपी बदलण्याच्या नादात, करपून जाते डाळ
पहीलं तुझ वाॅटसप चुली मंधी जाळ
लगिन झालय आपलं
शहाण्या सारख वागावं
चार दिसाचं सासू सासरं
तोंड भरून बोलावं
आम्ही मरून गेल्यावर
बस वाजवीत टाळ
पहीलं तुझ वाॅटसप चुली मंधी जाळ
रोज एक मेनू बनवतेस
वाजवतेस झोपाय बारा
पुलाव असतो चांगला
पण त्यात दगड अन् गारा
टून्ग टून्ग वाजतो फोन
पोरी लक्ष थोडं टाळ
पहीलं तुझ वाॅटसप चुली मंधी जाळ
डोळ्याला लागल चष्मा
अंगठा होईल बाद
खरच सांगते सुनबाई
ह्यो चांगला नाय नाद
मान्य हाय दुनिया चंद्रावर गेली
पण मान मर्यादा पाळ
नायतर पोटातूनच
नेटपॅक माराय सांगल बाळ
पाया पडते सुनबाई
वाॅटसप चुली मंधी जाळ स
चुली मंधी जाळ