1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 17 जानेवारी 2018 (11:39 IST)

आम्हालाही हळदीकुंकू करावसं वाटतं

whats app message
मैत्रिणींच्या सहवासात रमावसं वाटतं
आम्हालाही हळदीकुंकू करावसं वाटतं
 
शहरं गेली वाढत, घरं झाली दूर,
भेटीसाठी फेसबुक, व्हॉट्स अप चा टूर
प्रत्यक्षातही कधीतरी भेटावसं वाटतं
 
मिस्टरांचं ऑफिस, मुलांच्या शाळा;
तारेवरची कसरत करून सांभाळायच्या वेळा
स्वत:साठी कधीतरी जगावसं वाटतं
 
काळ धावतो भराभरा, रुटीन झालंय बिझी
जगणं झालय डिफ़िकल्ट काहीच नाही ईझी
काळाला या क्षणभर थांबवावसं वाटतं
 
साड्या पडल्यात कपाटात, अंगावरती ड्रेस
मनगटाला नुस्तं घड्याळ, क्लचरमध्ये केस
दागिने अन साड्या लेऊन मिरवावसं वाटतं
 
तप झालं लग्नाला, संवाद आला सरत
एकमेकांसाठी आता वेळही नाही उरत
उखाण्यात प्रेम व्यक्त करावसं वाटतं
आम्हालाही हळदीकुंकू करावसं वाटतं