शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 26 नोव्हेंबर 2018 (12:39 IST)

आपले मन अथांग आहे

दूधाला दुःख दिले की दही बनते.
दह्याला दुखावले की ताक बनते.
ताकाला त्रास दिला तर लोणी बनते.
आणि लोण्याला लोळवले तर तूप बनते.
दुधापेक्षा दही महाग.
दह्यापेक्षा ताक महाग.
ताकापेक्षा लोणी महाग.
लोण्यापेक्षा तूप महाग.
परंतु या सर्वांचा रंग एकच, शुभ्र.
 याचाच अर्थ पुन्हा पुन्हा संकटे आणि दुःख झेलुनही जो माणुस आपला रंग बदलत नाही अश्या माणसाची समाजातील किम्मत जास्त असते.
दूध उपयोगी आहे पण एक दिवसात नासते.
दूधाचे विरजण दही दोन दिवस टिकेल. 
दह्याच्या घुसळलेल्या ताकाचे दिवस तीन. 
ताकामधले लोणी आठवडाभर राहील. 
पण लोण्याचे कढवलेले तूप मात्र कधीही खराब होत नाही.
आता बघा आहे की नाही गंमत, एका दिवसातच नासण्याऱ्या दूधात कधीही न नासणारे तूप लपले आहे...!
तसेच आपले मन अथांग आहे. त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा...!
 
चिंतन करा, मनन करा आणि आपले जीवन तावुन सुलाखून त्यातुनच बाहेर पडलेले तुम्ही..!
म्हणजेच कधीही न हरणारे एक सदाबहार व्यक्तीमत्व..