शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 11 जानेवारी 2017 (11:49 IST)

सॉरी यार....

अभ्या " मुलगीच " झाली रे . मित्राने फोन केला , तो ही परदेशातून ...
 
बातमीच नुसती ती , आनंदाची की दुःखाची कशी ठरवणार ? त्याच्या बोलण्यात मात्र खंत जाणवत होती . पहिल्या मुलीनंतर त्याला मुलाची अपेक्षा सहाजिक होती . पण "मुलगीच" झाली रे ,  बोचत होतं कुठतरी आतमधे मला . 
 
मी नुसताच हसलो .. अभिनंदन , साल्या नशीबवान आहेस , मुलांच्या सेटलमेंट च टेंशन नाही , की म्हतारपणात लाथा नाहीत . मी विषयाला हात घातला . तुझ ठीक आहे रे , बोलण सोपं आहे दोन्ही मुलींवर थांब म्हणुन... त्याचा आवाज अजुन खोल होत गेला . 
 
मग मात्र मी त्याला थेट भिडायचं ठरवलं .... तुम्ही दोघे भाऊ ना रे , आणि एक बहिण . तुम्ही दोघ परदेशात आणि बहिण एकटीच इथे ना ?? 
 तो हो म्हणाला. तुझ्या आईची अँजोप्लास्टी झाली ना रे दोन महिन्या पूर्वी . तुम्ही दोघे आला नाहीत . मी गेलो होतो काकुंना भेटायला . तुझी बहिण सासरी राहून सगळ पहात होती रे , अगदी मना पासुन . तुम्हा दोघा भावांपैकी एकाला ही वेळ नव्हता रे ! तुला माहीत आहे काकू निघताना काय म्हणाल्या ?? देवाची कृपा म्हणुन पदरात एक पोरगी टाकली त्याने . . . 
 
बस्स !!!  खूप वेळ शांतता...
 
आणि नंतर फक्त दोनच शब्द.....
सॉरी यार.