बाळ झालं की कुकरची शिट्टी घेऊन या
नवीन लग्न झालेलं जोडपं, श्री व सौ, नवीन प्रेशर कुकर खरेदी करायला पुण्यातील तुळशीबागेत गेले..
दुकानदाराने त्यांना कुकरचे दोन तीन प्रकार दाखवले.
सौं ना एक कुकर पसंत पडला.
दुकानदाराने, "कुकरवर नाव काय टाकायचे सांगा..??" विचारलं.
बाईसाहेब लाजत "कुकर वर माझे टाका आणि कुकरच्या झाकणावर ह्यांचं नाव टाका..."
दुकानदार (तोही पुणेरीच) "एकदा बाळ झालं की कुकरची शिट्टी घेऊन या, त्या शिट्टीवर बाळाचं नाव घालून देईन, फुकट...