रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated : शुक्रवार, 8 मार्च 2019 (10:25 IST)

स्त्री स्वतःच पूर्णरुप !

ज्या रात्री गौतम बुद्धांनी घर
आणि पत्नीला सोडले, त्याच रात्री त्यांना पुत्रप्राप्ती झाली.
    पुत्रप्राप्तीचा आनंद असतानाही पतीने घर सोडल्याची बातमी जेव्हा तिला समजली तेव्हा ती उध्वस्त झाली. पण तिने कुणाकडे ही तक्रार केली नाही. आणि जग ज्याच्याकडे अभिमानाने पाहिल, अशा पद्धतीने मुलाला वाढविण्याचे तिने ठरवले. सोडून गेलेल्या पतीला विसरून तिने नवे आयुष्य सुरु करावे,असे तिला सर्वांनी सुचवले. दुसरे लग्न करण्याची गळ घातली, तिने त्यास नकार दिला.
    आणि एका सुंदर सकाळी.........
ते परत आले आणि तिच्या समोर उभे राहिले.
     तिने शांतपणे त्यांना विचारले, "आता तुम्हाला लोक 'बुद्ध'म्हणून ओळखतात ना?"
      त्यांनी ही तितक्याच शांत 
पणे उत्तर दिले, "होय, मी देखील तसे ऐकले आहे. "
    तिने पुढे विचारले, "त्याचा अर्थ काय?"
   "जगण्याचा अर्थ कळला आहे, अशी व्यक्ती !"तेम्हणाले.
     ती किंचितशी हसली आणि मग शांत बसली.
   काही वेळाने ती म्हणाली,
"आपण दोघेही काहीतरी नवे
शिकलो आहोत, असे मला वाटते. तुम्ही जे शिकला आहात, त्यातून हे जग सम्रुद्ध
होईल पण मी जे शिकले आहे, ते
फारसे जगापुढे येणारच नाही."
    बुद्धांनी तिला विचारले, "तू काय धडा शिकलीस ?"
    तिचे डोळे चमकले. डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.
   "तो धडा म्हणजे धैर्य! स्त्रीला उभी रहाण्यासाठी कुणाचीही गरज लागत नाही. तिचे स्वतःचे व्यक्तिमत्व हे परिपूर्ण असते. ती न डगमगता कोणत्याही परिस्थितीतून खंबीरपणे मार्ग काढू शकते. "
    यशोधरेतील 'स्त्री'ला मनापासून नमस्कार !