Marathi Biodata Maker
✕

अकबर-बिरबलची कहाणी : जादूचा गाढव

Updated: मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025 (20:09 IST)
 
आता तो हार आपणचं शोधा असे ही म्हणाले. वेळ ना गमावता लगेच बिरबलाने राजमहालात काम करणाऱ्या सर्व सेवकांना दरबारात हजर होण्यास सांगितले. दरबारात ते सर्व कामगार आले परंतु बिरबलांचा कुठे ही पत्ता नव्हता. सर्व बिरबलाची वाट बघत होते. तेवढ्यात बिरबल आपल्या सह एक गाढव घेऊन आले आणि म्हणाले की हा माझा मित्र आहे आणि हा गाढव सामान्य नसून जादुई आहे. ह्याचा कडे जादूची अशी शक्ती आहे ज्यामुळे बेगमचा हार कोणी चोरला आहे ते कळेल.  
ALSO READ: अकबर-बिरबलची कहाणी : मेणाचा सिंह
नंतर बिरबल त्या गाढवाला एका जवळच्या खोलीत जाऊन बांधून येतो आणि येऊन म्हणतो की आता सर्व कामगारांनी एक एक करून त्या खोलीत जावे आणि या गाढवाची शेपूट धरून जोराने ओरडावे की "बादशहा मी हार चोरी केला नाही. आणि हा आवाज या दरबार पर्यंत आला पाहिजे. सर्वानी असे केल्यावर तो गाढव स्वतःहून सांगेल की चोर कोण आहे. आणि हार कोणी चोरला आहे. सर्व सेवक एकएक करून त्या खोलीत जातात आणि गाढवाची शेपूट धरून जोरात ओरडतात "बादशहा मी चोरी केली नाही". सर्व जाऊन आल्या वर बिरबल त्यांना त्यांचे दोन्ही हात पुढे करण्यास सांगतात आणि त्या हाताचा वास घेतात. वास घेत घेत ते एका सेवक जवळ येऊन  त्याचे हात धरून जोरात ओरडतात की बादशहा हुजूर "हाच आहे तो चोर. " बादशहा त्यांना म्हणतात ''बिरबल आपल्याला कसे समजले की हाच चोर आहे" एवढ्या विश्वासाने कसे सांगत आहात. "आपल्या त्या जादुई गाढवाने ह्याचे नाव सांगितले आहे. "
ALSO READ: अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे
बिरबल म्हणाले की  बादशहा हा सामान्य गाढवच आहे हा काही जादुई गाढव नाही. मी त्याच्या शेपटीला सुवासिक द्रव्य लावले होते. ज्यांनी त्याचा शेपटीला धरले त्यांच्या हाताला तो सुवासिक वास येत होता. पण ह्याने शेपटीला धरलेच नाही म्हणून ह्याच्या हाताला तो वास येत नाही. अशा प्रकारे बिरबलाच्या चातुर्याने चोर आणि बेगमचा हार देखील सापडला. बिरबलाच्या चातुर्याचे सर्वानी कौतुक केले.  
ALSO READ: अकबर-बिरबलची कहाणी : अधिक चतुर
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments