Dharma Sangrah
✕

अशी तयारी असेल तर स्वयंपाक करायला फारसा वेळ लागत नाही

Updated: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (08:51 IST)
 
पालेभाज्या आदल्या दिवशी साफ करून ठेवाव्यात म्हणजे, आयत्या वेळी धुऊन व चिरून चटकन भाजी करत येईल.
 
आठवड्याला लागणारा नारळ एकदाच किसून फ्रीजमध्ये ठेवावा.
 
भाजलेल्या कांदा-खोबऱ्याचे वाटण एकदाच जास्तीच करून त्यात थोडे मीठ घालून फ्रीजमध्ये ठेवल्यास १०-१५ दिवस चांगले राहू शकतो.
 
पोळीची कणीक मळूनही फ्रीजमध्ये ठेवल्यास आयत्या वेळी झटपट पोळ्या करता येतील.
 
पराठे करण्यासाठी गाजर, बीट, मुळा, कोबी किसून तो थोडा परतून घ्यावा व त्यात आलं, लसूण, मिरची पेस्ट व मीठ, लिंबू, साखर घालून परतून कोरडा करावा व हा अर्धवट कच्चा कीस डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावा. हा कीस ८-१० दिवस चांगला राहतो व मुलांना पाहिजे तेव्हा पोळीच्या पिठात भरून झटपट पौष्टिक पराठे करून देता येतील.
 
भाज्या झटपट होण्यासाठी छोटा २-३ लीटरच कुकर वापरावा. गवार, घेवडा, तोंडलीसारख्या सुक्या भाज्या करण्यासाठी भाजी कुकरामध्येच फोडणीला द्यावी व त्यात मीठ, गूळ, खोबरे घालून अर्धी वाटी पाणी घुणा कुकराला २ शिट्या काढाव्यात. अगदी ५ मिनिटांतच छान भाजी तयार होते. रस भाजी व उसळी करण्यासाठी बेताचे पाणी घालावे व ३ शिट्या काढाव्यात. (शिट्या जास्त काढल्यास भाजी जास्त शिजून कुस्करेल.) प्रेशर कुकरच्या वापरामुळे इंधन व वेळ दोन्हीची बचत होते.
 
डोसे व उत्तप्पाचे जास्तीचे पीठ करून २-३ दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो व आयत्या वेळी डोसे व उत्तपे करू शकतो.
 
कोणत्याही भाज्या चिरण्यापूर्वी धुवाव्यात. भाज्या चिरल्यानंतर धुतल्यास त्यातील जीवनसत्त्वे पाण्यातून निघून जातील.
 
रवा उन्हात वाळवून किंवा कोरडाच भाजून थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवावा. १-२ महिने चांगला राहील. अळ्या पडणार नाहीत व घाईगडबडीत रवा निवडण्याचा वेळ वाचेल.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

दिवाळी पार्टी असो वा पूजा, तुमचा सणासुदीचा लूक आकर्षक करण्यासाठी या फॅशन टिप्स अवलंबवा

दिवाळीत दम्याचा त्रास वाढू नये म्हणून घ्या विशेष काळजी! फटाक्यांच्या धुरापासून बचावासाठी लक्षात ठेवा या ५ महत्त्वाच्या गोष्टी

साठ दिवसांचा महिना: अकबर आणि बिरबलची गोष्ट

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

गुलाबजाम मऊ आणि रसरशीत होण्यासाठी पाकात घाला 'ही' एक गोष्ट; पाहा सोपी पद्धत

पुढील लेख
Show comments