शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (09:00 IST)

सोप्या किचन टिप्स अवलंबवा आयुष्य सोपे बनवा

1 पुऱ्या कुरकुरीत बनवायच्या असल्यास गव्हाच्या पिठात एक चमचा रवा आणि तांदळाचं पीठ मिसळा. पुऱ्या कुरकुरीत बनतात.
 
2 कांदा गॅस स्टोव्ह जवळ कापा किंवा कापण्या पूर्वी फ्रीज मध्ये ठेवा या मुळे डोळ्यातून पाणी येणार नाही. 
 
3 टोमॅटो जास्त पिकले असल्यास थंड पाण्यात मीठ मिसळून टोमॅटो बुडवून रात्रभर ठेवा टोमॅटो फ्रेश होतील.
 
5 नेहमी मोठ्या आकाराचे आणि पातळ त्वचेचे लिंबू घ्या. हे जास्त रसाळ असतात.
 
6 दूध उतू जाऊ नये, या साठी भांड्याच्या कडेला थोडंसं लोणी लावा. असं केल्यानं दूध उतू जाणार नाही.
   
7 स्वीटकॉर्न चा पिवळा रंग कायम ठेवण्यासाठी उकळवून आंचेवरून काढल्यावर त्यामध्ये लिंबाचा रस मिसळा. 
 
8 लिंबाचा रस काढण्यापूर्वी लिंबू गरम पाण्यात 20 मिनिटं बुडवून ठेवा. असं केल्यानं रस जास्त निघेल.
 
9 पोळ्या करताना पिठी म्हणून तांदळाचे पीठ लावा पोळ्या मऊ बनतात.
 
10 जर आपण ग्रेव्ही ची भाजी बनवत आहात तर मीठ शेवटी घाला. असं केल्यानं दही फाटणार नाही.
 
 
11 भात शिल्लक उरला असेल तर -
 
* फ्राईड राईस बनवा.
 
* भाता मध्ये आलं-हिरव्या मिरचीची पेस्ट मीठ,हळद,तिखट आणि गव्हाचं पीठ मिसळून कणिक मळून घ्या आणि  राईस पराठा बनवा.
 
* भातामध्ये आलं मिरची पेस्ट,शेंगदाणेकूट, उकडलेला बटाटा,आणि कोर्नफ्लोर घालून टिक्की बनवा आणि तळून घ्या चविष्ट राईस क्रिस्पीझ तयार.