कामाच्या काही सोप्या कुकिंग टिप्स
बऱ्याचदा अन्न शिजवताना कधी भाजीत तर कधी वरणात मीठ जास्त होते, कधी दूध भांड्याला चिटकते, तर कोशिंबिरीसाठी चिरलेली काकडी कडू लागते. असं होऊ नये त्या साठी काही टिप्स सांगत आहोत.
*काकडी मध्यभागी चिरून ठेवा कडूपणा नाहीसा होईल.
*काकडीच्या टोकाला कापून चोळून घ्या असं केल्यानं देखील कडवटपणा नाहीसा होईल.
* दूध उकळताना बऱ्याच वेळा भांड्याच्या तळाशी चिटकत असं होऊ नये त्या साठी दूध भांड्यात घालण्यापूर्वी भांड्यात 2 चमचे पाणी घाला.
* लोखण्डाच्या कढईत अन्न शिजवल्यावर शरीरात असलेली आयरनची कमतरता दूर होते.
* लोणचे प्लास्टिक च्या डब्यात ठेवल्यावर ते लवकर खराब होत त्याला बुरशी लागते. असं होऊ नये त्यासाठी काचेच्या किंवा सिरॅमिक भांड्यात ठेवा.
* रसदार भाजीत मीठ जास्त झाले असल्यास त्यामध्ये कणकेच्या लहान लहान गोळ्या घालून द्या. एक उकळी आल्यावर कणकेचे गोळे काढून घ्या. मीठ कमी होईल. मीठ कमी झाले नसले तर त्यामध्ये एक ब्रेडचा तुकडा घालून ठेवा थंड झाल्यावर ब्रेड काढून घ्या.
* भेंडीच्या भाजीचा चिकटपणा दूर करण्यासाठी शेवटी लिंबाचा रस घालून द्या. असं केल्यानं भाजी चिकट होत नाही आणि भाजीची चव देखील वाढेल.
* भाजीचा रंग नैसर्गिक असावे त्यासाठी भाजी बनवताना थोडी साखर घाला.
* ग्रेव्ही चविष्ट बनविण्यासाठी कांदा, लसूण, आलं आणि दोन भाजके बदाम वाटून घ्या नंतर ही पेस्ट परतून घ्या आणि भाजीत वापरा.
* भाजी उकळवून बनवायची असल्यास उकळताना मीठ घाला त्याचे रंग बदलणार नाही आणि भाजी चविष्ट बनेल.