मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (20:37 IST)

कांद्याची टिक्की

आपण चहाबरोबर नेहमी भजे खातोच परंतु या वेळी काही नवीन बनवून बघा हे बनविणे खूप सोपे आहे आणि लवकर बनत.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य-
2 मोठे आकाराचे कांदे पातळ काप केलेले, 2 चमचे कोथिंबीर बारीक चिरलेली, 1/2 कप तांदळाचं पीठ, 1 बारीक चमचा तेल,1 हिरवी मिरची बारीक चिरलेली, 1 लहान चमचा आलं किसलेलं, जिरे,तिखट,मीठ चवीप्रमाणे. तळण्यासाठी तेल.
 
कृती -
कांदे,कोथिंबीर,आलं,हिरव्या मिरच्या,तिखट,जिरे मीठ तेल एकत्र करून मिक्स करा.थोडंसं तांदळाचे पीठ घाला. थोडंसं पाणी घाला आणि पीठ  मळून घ्या. तेल मध्यम आचेवर तापत ठेवा. कणिकांतून थोडे मिश्रण घेऊन हाताने टिक्की चा आकार द्या आणि गरम तेलात सोडा. सोनेरी तपकिरी रंग येई पर्यंत दोन्ही बाजूने तळून घ्या. तळलेल्या या टिक्की टिशू पेपर वर काढून घ्या. जेणे करून अतिरिक्त तेल निघेल.अशा प्रकारे सर्व टिक्की तळून घ्या आणि  गरम टिक्की सॉस किंवा चटणी सह चहा बरोबर खाण्याचा आनंद घ्या.