रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (20:16 IST)

काय सांगता, पोहे खाल्ल्याने फायदा होतो

बऱ्याच लोकांना असं वाटते की पोहे म्हणजे फक्त न्याहारीमध्ये घेतले जाणारे एक खाद्य पदार्थ. परंतु असं नाही पोह्यात अशे बरेच घटक आढळतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. बरेच कमी लोक हे जाणतात की पोहे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चला तर मग पोह्याचे फायदे जाणून घेऊ या.
 
पोहे खाण्याचे फायदे- 
 
* पोह्यात आयरन मुबलक प्रमाणात आढळते. जे शरीरात हिमोग्लोबिन आणि प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.
* हे बनविण्यासाठी या मध्ये भाज्या वापरल्या जातात. म्हणून ह्यांना खनिजे, फायबर आणि व्हिटॅमिन चा खजिना देखील म्हणतात.
* काही लोक पोहे बनविण्यासाठी सोयाबीन, सुकेमेवे आणि अंडी देखील वापरतात. या मुळे शरीराला व्हिटॅमिन सह प्रथिने देखील मुबलक प्रमाणात मिळतात.