मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (22:06 IST)

घरीच बनवा चविष्ट कुकीज

साहित्य 
 
2 कप मैदा,दीड चमचे - बेकिंग पावडर,1 कप बदाम,1 कप लोणी, 1 कप बारीक साखर, 2 चमचे दूध.
 
कृती -
 
मैदा आणि बेकिंग पावडर चाळून घ्या, 20 ते 25 बदाम तसेच राखून बाकीचे दरीदरीत वाटून घ्या. बाकीचे बदाम अर्ध्या तासासाठी कोमट पाण्यात भिजवून ठेवा. पाण्यातून काढून लांब लांब 2 काप करा. एका भांड्यात लोणी वितळवून त्यामध्ये बारीक साखर घालून फेणून घ्या. या मध्ये मैदा घालून चांगल्या प्रकारे फेणून घ्या. बदामाची भुकटी आणि दूध घालून मैदा मळून घ्या.एका ट्रे मध्ये तूप लावून त्या वर मैद्याचे लहान लहान लाट्या बनवून कुकीज चा आकार द्या. मधून मधून वरून बदाम लावा.सर्व कुकीज तयार करून घ्या. पण लक्षात ठेवा की ह्या कुकीज अंतर राखून ठेवायचे आहे. ओव्हन 180 अंशावर गरम करावे आणि कुकीज त्यामध्ये 15 मिनिटे बॅक करा. कुकीज चा रंग तपकिरी झाला तर समजावं कुकीज झाले आहे अन्यथा 5 मिनिटे पुन्हा बॅक करा. कुकीज थंड झाल्यावर हवा बंद डब्यात ठेवा.
 
टीप - कुकीज  ट्रे मध्ये ठेवताना हे लक्षात ठेवा की कुकीज बॅक झाल्यावर आकारात वाढतात, म्हणून कुकीज ट्रे मध्ये अंतर राखून ठेवा. चिटकल्यावर ह्या व्यवस्थित बॅक होणार नाही.