बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (10:38 IST)

काही कुकिंग टिप्स अवलंबवा जे आपल्या कमी येतील

शिळ्या पोळ्या शिल्लक असतील  तर- 
 
1 पोळ्या कुरकुरीत होई पर्यंत तळून घ्या. या वर तिखट,मीठ,चाट मसाला, दही, चिंच गुळाची चटणी घालून सर्व्ह करा.
2 पोळ्या तळून घ्या आणि त्यावर मीठ, तिखट, आमसूल पूड घालून मसाला पोळी बनवा.
3 बटाट्याची भाजी आणि पोळी शिल्लक राहिली असल्यास पोळीला बटर लावून शेकून घ्या या वर बटाट्याची भाजी,बारीक चिरलेला कांदा आणि कोबी घालून फ्रॅन्की बनवा.
4 पोळ्यांना पिझ्झा सॉस, ढोबळी मिरची, कांदे,आणि चीझ घालून शेकून घ्या. चविष्ट पोळी पिझ्झा तयार. 
5 पोळ्या मिक्सर मध्ये बारीक करून त्यामध्ये मीठ हळद तिखट घालून कांदा घालून फोडणी द्या.फोडणीची पोळी किंवा कुस्करा तयार.