शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (20:18 IST)

सोप्या किचन टिप्स

1 वरणासाठी डाळ शिजवताना या मध्ये मेथीदाणे मिसळा, ऍसिडिटी आणि गॅसचा त्रास होणार नाही आणि वरण देखील चविष्ट लागेल . 
 
2 घरात ब्रेड किंवा पाव शिल्लक राहिले असतील तर त्यामध्ये हिरव्या मिरच्या,आलं, कांदा,मीठ पाणी मिसळून घोळ बनवा आणि ब्रेड पकोडे बनवा.
 
3 केक किंवा पुडिंग बनवताना बेदाणे आणि सुकेमेवे घालायचे असल्यास घोळात घालण्यापूर्वी कोरड्या गव्हाच्या पिठात लावून घ्या .असं केल्यानं बॅक करताना ते घोळात बुडणार नाही.
 
4 खीर बनवताना दूध उकळल्यावर गॅस मंद करून 8 चा आकार बनवत लाकडाच्या चमच्याने सतत ढवळून घ्या साखर नेहमी शेवटी मिसळा. असं केल्यानं खिरीचा तांदूळ लवकर शिजतो. साखर आधीपासून मिसळल्यावर तांदूळ शिजायला वेळ लागतो.
 
5 एखाद्या पदार्थात बटर घालताना बटरच्या बरोबर थोडंसं तेल मिसळा. बटर जळणार नाही.     
 
6 फरशीवर तेल, तूप, किंवा दूध सांडल्यावर त्यावर गव्हाचं पीठ टाका नंतर पेपर ने पुसून घ्या फरशीवरचे डाग आणि तेलकटपणा नाहीसा होतो. 
 
7 स्वयंपाक करताना भांड जळाल्यावर त्यामध्ये थोडंसं डिटर्जंट घालून त्यामध्ये पाणी घालून उकळवून घ्या भांड स्वच्छ होईल.
 
8 गॅस किंवा किचन कट्ट्याची स्वच्छता करण्यासाठी जुने मोजे वापरा. ह्याच्याने स्वच्छता चांगली होईल आणि स्क्रॅच देखील येणार नाही.
 
9 किचनमधील वॉशबेसिन चे डाग काढण्यासाठी लिंबाला व्हिनेगरमध्ये बुडवून बेसिनवर घासा.
 
10 क्रॉकरी स्वच्छ करण्यासाठी स्पंज वापरा, या मुळे क्रॉकरीवर स्क्रॅच पडत नाही.