शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By

मऊ आणि फुललेली पोळी बनवायची जाणून घ्या योग्य पद्धत

Chapati recipe
पोळी हे एक असे खाद्य आहे जे जवळ जवळ सर्व भारतीयांच्या घरात बनवली जाते. पोळी खाल्याशिवाय लोकांचे पोट भरत नाही. अनेक घरी लंच आणि डिनरमध्ये पोळी खाल्ली जाते. पण अनेक लोकांचे म्हणणे असते की पोळी बनवणे सोप्पे नसते. लोक पोळी बनवण्याची कृती जाणतात आणि रोज पोळी बनवतात. पण त्यांची तक्रार असते की त्यांची पोळी फुलत नाही आणि मऊ देखील बनत नाही. अनेक वेळेस लोक भिजवलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवतात. ज्यामुळे पोळी मऊ बनत नाही. म्हणून फ्रिज मध्ये ठेवलेल्या कणकेची मऊ आणि फुललेली पोळी कशी बनवावी जाणून घ्या 
 
फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणकेची मऊ पोळी बनवायची टिप्स 
जर मळलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवली असेल तर, पोळी बनवण्यापूर्वी गोळा परत एकदा माळावा. याकरिता कोमट पाण्याचा उपयोग करावा, फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या गोळ्यावर एक लेयर तयार होते. या लेयरला काढण्यासाठी कणकेचा गोळा परत मळावा. गोळा माळतांना थोडे थोडे पाणी लावावे. तसेच गोळ्यातून फ्रीजचा ठंडवा गेल्यानंतर पोळी लाटावी. तसेच फ्रीजमधून काढलेला गोळा परत मळायला वेळ नसेल तर पोळी बनवल्यावर ती गॅस मोठा करून शेकू नये. असे केल्याने पोळी पापडसारखी कडक होईल. 
 
फ्रीजमधून कणिक बाहेर काढून लगेच पोळी बनवू नये. पाहिले कणकेला रूम टेम्परेचर वर ठेवावे. फ्रीजमधून कणिक बाहेर काढून लगेच पोळी बनवल्यास तिची चव देखील बदलते. जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या गोळ्याची पोळी खाऊ नये. कारण ती नरम होत नाही आणि चव देखील चांगली लागत नाही. तसेच उन्हाळ्यात शिळा झालेला कणकेचा गोळा हा नुकसानदायक असतो. म्हणून फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवलेल्या कणकेच्या गोळ्याची पोळी खाऊ नये.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik