Daily Horoscope
✕

कुकरमध्ये भात आणि वरण व्यवस्थित शिजण्यासाठी काही छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स

Updated: मंगळवार, 24 मार्च 2026 (19:19 IST)
 
भातासाठी: १ वाटी तांदळाला साधारण २ ते २.५ वाट्या पाणी वापरावे (तांदळाच्या प्रकारानुसार हे थोडे बदलू शकते).
 
वरणासाठी: १ वाटी डाळीला २.५ ते ३ वाट्या पाणी वापरावे.
 
३. डब्यांची मांडणी
खालचा डबा: कुकरच्या तळाला नेहमी डाळीचा डबा ठेवावा. डाळ शिजायला जास्त उष्णता लागते, म्हणून ती खाली असावी.
वरचा डबा: भाताचा डबा डाळीच्या डब्यावर ठेवावा.
 
४. कुकर लावण्याची कृती-
१. कुकरच्या तळाला १ ते १.५ ग्लास पाणी ओता. त्यात लिंबाची एक चकती किंवा चिंच टाका (जेणेकरून कुकर आतून काळा पडणार नाही).
२. डाळीच्या डब्यात: डाळ, पाणी आणि त्यात चिमुटभर हळद, हिंग आणि पाव चमचा तेल टाका. तेलामुळे डाळ कुकरबाहेर उतू जात नाही.
३. भाताच्या डब्यात: तांदूळ, पाणी आणि चवीनुसार मीठ टाका. भात पांढराशुभ्र आणि सुटसुटीत हवा असेल तर त्यात २-३ थेंब लिंबाचा रस किंवा थोडे तूप टाका.
४. कुकरचे झाकण लावण्यापूर्वी त्याची शिट्टी आणि रबर नीट तपासा.
 
५. शिट्ट्यांचे गणित
गॅसची फ्लेम मोठी ठेवून पहिली १ शिट्टी होऊ द्या.
त्यानंतर गॅस मध्यम (Medium) करून २ ते ३ शिट्ट्या होऊ द्या.
गॅस बंद केल्यावर कुकरची वाफ आपोआप निघू द्या (किमान १०-१५ मिनिटे). जबरदस्तीने शिट्टी उचलून वाफ काढल्यास अन्न नीट शिजत नाही.
 
काही टिप्स-
वरण फेटणे: डाळ शिजल्यावर ती रवीने व्यवस्थित फेटून घ्यावी, म्हणजे वरण एकजीव होते.
तूप: जेवताना गरम वरण-भातावर साजूक तुपाची धार असेल तर त्याची चव कित्येक पटीने वाढते.
पाण्याचे लेव्हल: कुकरमध्ये डब्यांच्या बाहेर जे पाणी असते, ते डब्यांच्या उंचीच्या १/४ पेक्षा जास्त नसावे, अन्यथा पाणी डब्यात शिरू शकते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Kitchen Hacks भेंडीची भाजी चिकट झाली तर काय करावे?,
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: विरजण न वापरता दही लावण्याच्या पद्धती

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Bhai Dooj 2026 भावाला खूश करण्यासाठी बनवा खास थाळी, जाणून घ्या सोप्या पाककृती

Happy Diwali Padwa to Husband in Marathi Images नवर्‍याला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

दिवाळीत दिसायचे आहे सर्वांत सुंदर? ग्लोइंग लुकसाठी मेकअपच्या ‘या’ खास टिप्स फॉलो करा

Annakut गोवर्धन पूजेसाठी घरी 'अन्नकूट' कसे तयार करावे? परंपरा आणि महत्त्व जाणून घ्या

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments