शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By

काय आपणही चहा बनवल्यानंतर फेकून देता चहा पत्ती?

दिवसातून किमान दोनदा तरी प्रत्येकाच्या घरात चहा बनतो. अनेक लोकांकडे याहून अधिक वेळा. परंतू चहा बनवल्यानंतर अनेक लोकं चहा पत्ती फेकून देतात. पण काय आपल्याला माहीत आहे की वापरलेली चहा पत्तीदेखील पुन्हा उपयोगात आणली जाऊ शकते? यासाठी आपल्या योग्य उपाय माहीत असावा. वारपलेल्या चहा पत्तीला स्वच्छ करून घ्या ज्याने त्यातील गोडावा दूर होईल. आता ही पत्ती आपण अशारित्या वापरू शकता:
 
* चहापत्तीत अँटी-ऑक्सीडेंट आढळतात. अशात जखमेवर चहा पत्तीचा लेप लावणे फायदेशीर ठरेल. उकळलेली चहा पत्ती स्वच्छ धुऊन घ्या आणि जखमेवर लावा. याने जखम लवकर भरेल.
 
* चहा पत्तीचे पाणी एक उत्तम कंडिशनर आहे. चहा पत्ती धुऊन पुन्हा उकळून घ्या आणि त्या पाण्याने केस धुऊन घ्या. याने केस चमकदार आणि नरम होतील.
 
* चहा पत्ती धुऊन वाळवून घ्या. छोले अर्थात काबुली चणे शिजवताना याची पुडी त्यात सोडा. चण्यांना छान रंग येईल.
 
* चहा पत्ती दुसर्‍यांदा उकळून घ्या. आता हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून फर्नीचरच्या स्वच्छतेसाठी वापरा. याने फर्नीचरला चमक येईल.