मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह शायरी
Written By
Last Updated : शनिवार, 8 फेब्रुवारी 2020 (16:46 IST)

नवरदेवासाठी उखाणे

पुरणपोळीत तुप असावे साजुक,
……. आहेत आमच्या फार नाजुक
 
निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात,
अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात
 
गाडीत गाडी डेक्कन क्वीन,
……. आहे माझी ब्युटी क्वीन
 
हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात,
… च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात
 
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका,
……चे नाव घेतो सर्वजण ऐका
 
दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला,
सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला
 
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
…ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम
 
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा
 
सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप,
…………..मला मिळाली आहे अनुरूप
 
पुढे जाते वासरु, मागुन चालली गाय,
… ला आवडते नेहमी दुधावरची साय
 
 
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
…………….चे बरोबर बांधली जीवन गाठ
 
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
…….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने
 
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
……..झाली आज माझी गृहमंत्री
 
पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे,
………चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे
 
अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर,
………..माझी सर्वांपेक्षा सुंदर
 
निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान,
…..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान
 
रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन,
… च्या साथीने आदर्श संसार करीन
 
काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध,
… सोबत जीवनात मला आहे आनंद
 
टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा,
… चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा
 
जगाला सुवास देत उमलली कळी,
भाग्याने लाभली मला… प्रेमपुतळी
 
काही शब्द येतात ओठातून,
…… चं नाव येतं मात्र हृदयातून
 
हत्तीच्या अंबारीला मखमली झुल,
माझी … नाजुक जसे गुलाबाचे फुल
 
दारी होते कोनाडे त्यात होती पळी,
माझी … व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी
 
आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड,
… चंनाव आहे अमृतापेक्षा ही गोड
 
जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध,
… च्या सहवासात झालो मी धुंद
 
उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात,
नवनांचा हार … च्या गळ्यात
 
प्रसन्न वदनाने आले रविराज,
… ने चढविला संसाराला स्नेहाचा साज
 
काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात
प्रथम दर्शनीच भरली… माझ्या मनात
 
रुप्याचा लोटा सोन्याची झारी,
असली काळीसावळी तर … माझी प्यारी
 
हिरळीवर चरती सुवर्ण हरिणी,
… झाली आता माझी सहचारिणी
 
सीतेसारखे चारीत्र्य, रंभेसारखे रुप,
… मिळाली आहे मला अनुरुप
 
सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग,
… माझी नेहमी घरकामात दंग
 
ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,
………चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल
 
मायामय नगरी, प्रेममय संसार, …
च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार
 
जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र,
… च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र
 
जाईच्या वेणीला चांदीची तार,
माझी … म्हणजे लाखात सुंदर नार
 
नंदनवनात अमृताचे कलश,
… आहे माझी खुप सालस
 
अस्सल सोने चोविस कॅरेट, …
अन् माझे झाले आज मॅरेज
 
जीवनात लाभला मनासारखा साथी,
माझ्या संसार रथावर … सारथी
 
हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी,
… च्या जीवनात मला आहे गोडी
 
चंद्रला पाहून भरती येते सागराला,
… ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.
 
चंद्राचा होता उद्य समुद्रला येते भरती,
… स्पर्शाने सारे श्रम हरती
 
स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविली शान,
…चे नाव घेतो ठेऊन सर्वाचा मान
 
उगवला सुर्य मावळली रजनी,
… चे नाव सदैव माझ्या मनी,
 
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
… बरोबर बांधली जीवनगाठ
 
आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर,
… च्या आगमनाने पडली त्या सुखात भर
 
संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी,
… मुळे लागली मला संसाराची गोडी
 
नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व,
… आहे माझे जीवन-सर्वस्व
 
रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे,
… ला पाहून चंद्र-सुर्य हसे
 
पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले,
… चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले
 
मातीच्या चुली घालतात घरोघर,
… झालीस माझी आता चल बरोबर
 
नभांगणी दिसे शरदाचे चांदणे,
.. चे रुप आहे अत्यंत देखणे
 
बहरली फुलांनी निशीगंधाची पाती,
… चे नाव घेतो लग्नाच्या राती
 
आपल्या देशात करावा हिन्दी भाषेचा मान,
…चे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान,
 
देवळाला खरी शोभा कळसाने येते,
… मुळे माझे गृहसौख्य दुनावते
 
देवा जवळ करतो मी दत्ताची आरती,
… माझ्या जीवनाची सारथी
 
देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले,
… शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले
 
देवाला भक्त करतो मनोभारे वंदन,
… मुळे झाले संसाराने नंदन
 
दही चक्का तुप,
… आवडते मला खुप
 
आंथरली सतरंजी त्यावर पांघरली शाल,
… रावांच्या जीवनात… राहील खुशाल
 
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,
… च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने