Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नात्यात दुरावा आणतात या 5 गोष्टी, काळजी घ्यावी

Updated: गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (13:09 IST)
 
* लग्नाच्या पूर्वी एकमेकांना समजून घेणं -
लग्न ठरल्यावर मुलगा आणि मुलीमध्ये चांगले संभाषण होणं गरजेचे असते. या मुळे ते दोघे एकमेकांचा स्वभाव आणि विचारांची देवाण घेवाण करू शकतात. आपसात सामंजस्यपणा असेल तर दोघांचे नाते चांगले जुळतील. पण आजच्या काळात देखील अशी काही कुटुंबे आहेत जिथे मुलगा आणि मुलगी भेटणं तर नाही पण त्यांना मनमोकळेपणे बोलणं देखील अशक्यच असत. या मुळे त्यांना भावी आयुष्यात एकमेकांशी जुळवून घेणं अवघड होतं.
 
* लग्नानंतरचा दुरावा - 
नवरा बायको दोघेही कामाला जाणं हे आजच्या आधुनिक काळात सामान्यच आहे. बऱ्याच वेळा काही लोक कामाच्या ठिकाणी मोठ्या पॅकेजच्या आमिषाला भुलून एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतात. या मुळे त्यांच्या नात्यात दुरावा येतो आणि आपसातील प्रेम कमी होतं. एकमेकांबद्दलचा विश्वास हळू-हळू कमी होऊ लागतो.
 
* ऑफिसमध्ये जास्त वेळ देणं - 
बऱ्याच वेळा ऑफिसमध्ये कामाचा जास्त ताण असल्यास काही वेळ जास्त द्यावा लागतो, त्यामुळे घरात मतभेदाचे वातावरण बनतात. जशे आपण बाहेरची जबाबदारी पूर्ण करता त्याच प्रमाणे दोघांना एकमेकांसाठी पुरेपूर वेळ द्यायला पाहिजे. बायकोने देखील आपल्या घराकडे तितक्याच जातीने लक्ष दिले पाहिजे. कामाचा जास्तीचा ताण आपल्या नात्यात दुरावा आणतो आणि हळू-हळू करून हे घट्ट नाते कमकुवत होऊ लागतात. म्हणून दोघांना घरात आणि ऑफिसात संतुलन ठेवता आले पाहिजे.
 
* अधिक व्यस्तता -
आपले दररोजचे जीवन इतके धावपळीचे झाले आहेत की एकमेकांसाठी वेळ काढणं अशक्य झाले आहे. या नात्यातील प्रेम टिकवून ठेवण्यासाठी काही वेळ एकमेकांसाठी काढावा. या साठी आपण आपल्या जोडीदारासह बाहेर फिरायला जाऊ शकता. या शिवाय आपण दोघे सकाळच्या वेळ जोडीने वॉकला जाऊन देखील घालवू शकता. या मुळे आपले आरोग्य तर निरोगी राहीलच तसेच नाते देखील निरोगी राहतील.
 
* शंका करणं टाळा -
मित्र बनवणं चुकीचे नसतं. आजच्या काळात मुले-मुली एकत्र काम करतात. म्हणून आपल्या जोडीदारावर सहकाऱ्याला घेऊन शंका करू नये. 
 
शंका करणं ही अशी कीड आहे जी नात्यात लागली की आपल्या बऱ्याच वर्षाच्या नात्याला देखील संपवून टाकते. लक्षात ठेवा की आपल्या शंकेखोर असण्याचा स्वभावामुळे आणि दुर्लक्षित केल्यामुळे एखादा बाहेरचा व्यक्ती आपल्या सुखी वैवाहिक जीवनात विष देखील कालवू शकतो. तसेच आपल्या नात्यात दुरावा देखील आणू शकतो.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Independence Day 2026 Wishes in Marathi स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Independence Day 2026 Essay in Marathi स्वातंत्र्य दिन निबंध

Happy Independence Day 2026 Wishes Images स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा इमेज

श्रावण महिन्यात शनिवारी 'पारंपरिक कढी-खिचडी' बनवण्याची सुंदर परंपरा

स्वातंत्र्यदिन विशेष कुठलाही कृत्रिम रंग न वापरता बनवा ''तिरंगा हलवा रेसिपी''

पुढील लेख
Show comments