शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: सोमवार, 9 डिसेंबर 2024 (16:00 IST)

Boost Drive काम इच्छा वाढवण्यासाठी 3 सोप्या पद्धती, Private Life मध्ये येईल बहार

Boost Drive अलीकडे लिबिडो किंवा काम इच्छेची कमी अगदी सामान्य समस्या झाली आहे. लोकांच्या लाइफस्टाइलमध्ये ताण, एंग्जायटी, अनेहल्दी खाण्यापिण्याच्या सवयी आणि सतत धावपळ यात शारीरिक आणि मानसिक आरोग्यासह वैयक्तिक आयुष्यावर देखील प्रभाव पडतो आणि हळू-हळू शारीरिक संबंध ठेवण्यात रस कमी होऊ लागतो. खूप जास्त काळापर्यंत लो लिबिडो समस्येमुळे लोकांच्या वैवाहिक जीवनावरही परिणाम होऊ शकतो आणि यामुळे नात्यातील अंतर वाढू शकते. तथापि कधीकधी लोक कामेच्छा वाढवण्यासाठी काही औषधे देखील घेतात. परंतु या औषधांचे दुष्परिणाम असतात जे दीर्घकाळ दिसू शकतात.
 
अशात मेडिसीन न घेता नैसर्गिकरीत्या काम इच्छा वाढवण्यासाठी काय करावे आणि काय खबरदारी घेतली पाहिजे ते जाणून घ्या-
शारीरिक स्तरावर इच्छा वाढवण्यासाठी आहारात बदल करा-
योग्य आहार निरोगी शरीर आणि निरोगी लिबिडो पातळीसाठी आवश्यक आहे. जर तुम्हाला कमी काम इच्छेच्या समस्येपासून आराम मिळवायचा असेल तर तुमच्या आहारात बदल करा. रोजच्या आहारात बदल करा. 
 
तुम्ही झिंक आणि एल-अर्जिनिन सारख्या घटकांनी समृद्ध असलेले अन्न जसे की बीन्स, बिया, मासे आणि कांदे खा. आपण चॉकलेट, डाळिंब, एवोकाडो, ग्रीन टी, भोपळाच्या बिया आणि टरबूज सारखे पदार्थ खाऊ शकता.
 
सोबतच प्रोसेस्ड फूड्स टाळा कारण याने शरीराला नुकसान होत असून काम इच्छा देखील कमी होते.
 
व्यायाम करा- दररोज हलका व्यायाम करा. आपण मसल्स स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज, कार्डियाक एक्सरसाइज करा. दररोजय योगा आणि मेडिटेशन देखील करु शकता. याने लिबिडो बूस्ट करण्यात मदत होईल.
पुरेशी झोप- दररोज 6-7 तासाचा झोप घ्या. याने ताण कमी होईल आणि काम इच्छा वाढेल.
 
आजार सांभाळा- जर आपल्याला हायपटेंशन, लठ्ठपणा किंवा इतर कोणत्याही प्रकाराचे जुने आजार असतील किंवा क्रोनिक डिजिज असतील त्या त्यांना सांभाळा.
 
या सवयी टाळा- अल्कोहल, स्मोकिंग याने काम इच्छेत कमी येणे बघण्यात येते. अशात या सवयी कमी करा किंवा सोडून द्या.
खाजगी जीवनासाठी वेळ काढा- व्यस्त जीवनशैलीतून आपल्या पार्टनरसाठी वेळ काढा. पार्टनरसोबत क्वालिटी टाइम घालवा. रिलेशनशिपबद्दल चांगल्या आठवणी लक्षात घेऊन त्यावर बोला. याने नात्यात ताजेपणा जाणवेल.