Online Dating: ऑनलाइन डेटिंग करताना या गोष्टी लक्षात ठेवा, फसवणूक टाळा

Last Modified शनिवार, 16 एप्रिल 2022 (20:42 IST)
आजकालसर्व काही डिजिटल होत आहे. प्रेम देखील डिजिटल होत आहे. याचा अर्थ ऑनलाइन डेटिंगचा काळ आहे, जिथे लोक त्यांच्या जोडीदाराला इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांद्वारे भेटतात आणि नंतर त्यांचे प्रेम आणि नाते येथून सुरू होते. ऑनलाइन डेटिंग आणि पार्टनर शोधण्यासाठी अनेक ऑनलाइन डेटिंग अॅप्स उपलब्ध आहेत.कोरोनाच्या काळात ऑनलाइन डेटिंग अॅप्सची मागणी आणखी वाढली.पण काही गोष्टींचे फायदे आहे तर काही तोटे पण आहेत. असे अनेक लोक आहेत जे डिजिटल डेटिंगद्वारे फसवणुकीचे बळी ठरले. ऑनलाइन डेटिंग अॅप आणि फेसबुक किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक प्रेमाच्या नावाखाली फसवणुकीला बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत, फसवणुकीला बळी पडू नये या साठी ऑनलाइन डेटिंगदरम्यान फसवणूक टाळण्यासाठी सोप्या टिप्स जाणून घेऊ या.

ऑनलाइन डेटिंग करताना फसवणूक टाळण्याचे मार्ग-

* ऑनलाइन प्रोफाइल ठेवा सुरक्षित
ऑनलाइन डेटिंगसाठी सोशल मीडिया खाते किंवा ऑनलाइन प्रोफाइल वापरता. अशा परिस्थितीत, जेव्हाही आपण प्रोफाइल तयार करता तेव्हा त्यामध्ये वैयक्तिक माहिती शेअर करू नये याकडे लक्ष द्या. फोन नंबर, ईमेल आयडी किंवा प्रोफाईलवरील इतर माहिती सर्वांशी शेअर करू नका. ज्या व्यक्तीला डेट करत आहात त्याच्याशी वैयक्तिक माहिती विचारपूर्वक शेअर करा.

* नकार द्या -
जेव्हा लोक ऑनलाइन डेटिंग करू लागतात किंवा एखाद्याशी ऑनलाइन चॅटिंग करू लागतात, तेव्हा अनेकदा समोरची व्यक्ती असे काहीतरी करण्यास सांगते किंवा वैयक्तिक माहिती विचारते, जी आपण
त्याच्यासोबत शेअर करणे सोयीचे समजत नाही. पण नातेसंबंध बिघडू नये या साठी त्याच्या सर्व गोष्टी मान्य करता. हे अजिबात करू नका. जर
एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थता किंवा शंका वाटत असेल तर नकार द्या.
*विचारपूर्वक निर्णय घ्या-
लोक सहसा ऑनलाइन डेटिंग अॅप्सवर जोडीदार शोधण्याची घाई करतात. जर त्यांना सुरुवातीच्या टप्प्यात त्यांच्यासाठी अनुकूल किंवा योग्य जोडीदार सापडला तर घाईघाईने ते काही पावले पुढे जातात. असे करू नका. जरी ऑनलाइन वर एखादी व्यक्ती आवडली असल्यास त्यांनाअधिक जाणून घेण्यासाठी वेळ घ्या. त्यानंतर योग्य तो निर्णय घ्या. याबाबत कुटुंबीयांचे आणि मित्रांचे मत जाणून घ्या
* सावधगिरी बाळगा-

एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटता तेव्हा सावधगिरी बाळगा, तुम्ही लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हे नियम ऑनलाइन डेटिंगला देखील लागू होते. डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोणीतरी आवडले असल्यास आणि ऑनलाइन चॅटनंतर सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्यक्ष भेटायचे असल्यास
कधीही एकटे जाऊ नका. त्यापेक्षा
कुटुंबातील सदस्य, नातेवाईक किंवा मित्राला
सोबत घेऊन जा.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ?

शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ?
सईबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छ्त्रपती संभाजी महाराजांच्या ...

Career In in Advertisement After 12th: अॅडव्हर्टायझिंग ...

Career In in Advertisement After 12th: अॅडव्हर्टायझिंग मध्ये करिअर कसे करावे,व्याप्ती ,पगार ,पात्रता, कौशल्ये  जाणून घ्या
Advertisement Best Courses: आजचा काळ हा जाहिरातींचा काळ म्हणता येईल, कारण आजचा काळ हा ...

Post Office Recruitment 2022: डाक विभागात एक लाख पदांसाठी ...

Post Office Recruitment 2022: डाक  विभागात एक लाख पदांसाठी मेगा भरती ,पात्रता, तपशील जाणून घ्या
Post Office Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी यापेक्षा चांगली ...

घरपण

घरपण
घरी निघालो भरभर, डोक्यात चक्र चालू होत म्हणून कदाचित मंडईत शिरायचं राहीलंच. मग कडेच्याच ...

Janmasthmi Special Rajira Pieth Puri Recipe : जन्माष्टमी ...

Janmasthmi Special Rajira Pieth Puri Recipe  : जन्माष्टमी साठी विशेष राजगिरा पिठाच्या पुऱ्या रेसिपी
जन्माष्टमी हा मोठा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक जण उपवास धरतात. ...