शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (23:10 IST)

SBI Alert: तुम्हाला बँकिंग फसवणूक टाळायची असेल, तर कोणत्या नंबरपासून दूर राहावे

एसबीआय अलर्टः  आजकाल बँकिंग फसवणूक झपाट्याने वाढत आहे. यामध्ये विशेषत: फोनवरून लोकांची माहिती मागवून खात्यातून पैसे उडवण्याचे प्रकरण सर्वाधिक आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया- SBI  ने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. फसवणूक करणाऱ्या ग्राहक सेवा क्रमांकांपासून सावध राहण्याचा सल्ला बँकेने जारी केला आहे. 
 
फसव्या कस्टमर केअर नंबरपासून सावध राहा, असे बँकेने म्हटले आहे. योग्य ग्राहक सेवा क्रमांक जाणून घेण्यासाठी बँकेने SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला दिला आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर दिलेला ग्राहक सेवा क्रमांक वापरण्यास सांगितले आहे. यासोबतच बँकेने खातेदारांना त्यांची वैयक्तिक माहिती शेअर करू नये असे सांगितले आहे.
 
SBI ने व्हिडिओ जारी केला 
SBI ने खोट्या कस्टमर केअर नंबरपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांपासून वाचण्यासाठी एसबीआयने एक व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये फसवणूक टाळण्यासाठी उपाय सांगण्यात आले आहेत. एसबीआयच्या म्हणण्यानुसार, ज्या कस्टमर केअर नंबरची पडताळणी झालेली नाही, अशा ग्राहकांनी त्यांच्याशी बोलू नये. एसबीआयने म्हटले आहे की ग्राहकांना कस्टमर केअर नंबरसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. याआधीही एसबीआयने आपल्या ग्राहकांना बनावट ग्राहक सेवा क्रमांक आणि बनावट कॉल्सबाबत अलर्ट जारी केला होता.
 
देशभरात 70,786BC आउटलेट्स 
स्टेट बँक ऑफ इंडियाचे देशभरात 70,786BC आउटलेट्स आहेत. यासोबतच सीडीएमसह 22,230 शाखा आणि 64,122 एटीएम आहेत. इंटरनेट बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या 94.4 दशलक्ष आहे आणि मोबाईल बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या 21 दशलक्ष आहे. SBI चे डिजिटल प्लॅटफॉर्म YONO आहे. ज्यामध्ये 43 दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्ते आहेत. ज्यामध्ये दररोज 12 दशलक्ष वापरकर्ते लॉग इन करतात.