Dharma Sangrah
✕

मेथी चिकन मसाला रेसिपी

Updated: मंगळवार, 22 एप्रिल 2025 (14:10 IST)
काळी वेलची
दालचिनी
हिरवी मिरची 
एक कप- पाणी
अर्धा टीस्पून- लिंबाचा रस
अर्धा टीस्पून- तिखट
अर्धा टीस्पून- आले-लसूण पेस्ट
अर्धा टेबलस्पून- दही
एक टीस्पून- धणे पूड 
कसुरी मेथी 
तेल
चवीनुसार मीठ
ALSO READ: चिकन शमी कबाब रेसिपी
कृती- 
सर्वात आधी चिकनचे तुकडे एका भांड्यात ठेवा. आता चिकनवर लिंबाचा रस, लाल तिखट, मीठ आणि आले-लसूण पेस्ट घालून मॅरीनेट करा आणि ३० मिनिटे बाजूला ठेवा. तसेच एका भांड्यात दही, मीठ, धणे पूड, तिखट घाला आणि चांगले फेटून घ्या.मध्यम आचेवर एका पॅनमध्ये तेल घाला आणि ते गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम होताच त्यात कांदा घाला आणि परतून घ्या. कांदा परतल्यांनंतर तो थंड करा आणि ग्राइंडरच्या भांड्यात त्याची पेस्ट बनवा.आता त्याच पॅनमध्ये थोडे तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात मॅरीनेट केलेले चिकन घाला आणि ते सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. चिकन भाजल्यानंतर ते बाहेर काढा आणि प्लेटमध्ये ठेवा. आता त्याच पॅनमध्ये पुन्हा तेल घाला आणि ते गरम करा. गरम तेलात तमालपत्र, हिरवी वेलची, काळी वेलची, दालचिनी घाला आणि हलके तळा. तसेच आले-लसूण पेस्ट घालून हलके परतून घ्या. यानंतर टोमॅटो, कसुरी मेथी आणि दही घाला आणि ढवळत शिजवा. आता त्यात कांद्याची पेस्ट घाला, चांगले मिसळा आणि २ मिनिटे परतून घ्या. ग्रेव्ही तयार झाल्यानंतर, भाजलेले चिकन घाला आणि चांगले मिसळा.हिरव्या मिरच्या आणि पाणी घालून चांगले मिसळा. झाकण ठेवून २ मिनिटे शिजू द्या. परत थोडी कसुरी मेथी घाला आणि आणखी काही वेळ शिजवा. चिकन पूर्णपणे शिजल्यानंतर गॅस बंद करा. तर चला तयार आहे मेथी चिकन रेसिपी, पोळीसोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: हैदराबादी मटण पुलाव रेसिपी
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: चिकन मोमोज रेसिपी

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

चुकीच्या जीवनशैलीमुळे यकृताच्या आरोग्यावर होतोय परिणाम? निरोगी लिव्हरसाठी दररोज करा ही ५ योगासने!

नैतिक कथा : वडिल म्हणाले मुलाला दानात आनंद आहे

चॉकलेट बर्फी आणि ओरियो लाडू: लहान मुलांसाठी खास दिवाळी स्वीट रेसिपीज

Halloween Makeup Ideas हॅलोविन पार्टीसाठी ५ सोपे मेकअप आयडीया

तुमचा रक्तदाब सतत जास्त असतो का? किचनमधून तातडीने हटवा या ५ गोष्टी

पुढील लेख
Show comments