Festival Posters
✕

बाप माझा विठ्ठल विठ्ठल

Updated: गुरूवार, 12 जुलै 2018 (15:37 IST)
बाप एकटक पाहतो 
 
पोराच्या डोक्यावरून 
फिरवतो झोपित हात 
खुशाल ठेव देवा म्हणून 
जोडीत राहतो हात 
 
दिसतो तेवढा बाप कधीच 
कठोर रागीट नसतो 
खरं सांगतो बाप म्हणजे 
आईचंच रूप असतो 
 
घळा घळा आसवं गाळून
मोकळी होते माय  
दुःख दाबून बाप दाबतो
सावकाराचे पाय
 
हो म्हणतो लेकरासाठी 
पडेल ते काम करील 
त्याला साहेब करण्यासाठी 
मी नाच करील 
 
खिळे काटे दगड गोटे
पायात घुसत जातात 
अंधारात त्याच्या वेदना
पाणी पाणी होतात 
 
कसं होईल काय होईल
चैन पडत नाही 
बाप नावाचा संत कधी
दिवसा रडत नाही 
 
फादरचा " डे " फक्त 
वर्षातून एकदा असेल का ?
बैल गोठ्यात बसल्यावर 
शिवार हिरवं दिसेल का ?
 
सारं दुःख पोटात गिळून
मानेवर " जू " घेतो
तोंडातून रक्त आलं तरी
गाडा ओढीत राहतो 
 
रक्ताचे थेंब दिसूने म्हणून 
तोच टाकतो माती 
बाप ज्याला कळतो त्याची 
फुटून जाती छाती
 
आमच्यासाठी काय केलं 
असं विचारू नका 
म्हाताऱ्या बैलावर 
वार करू नका 
 
बापाची तिरडी उचलण्या आधी 
पोरांनी शहाणं व्हावं 
बाप माझा विठ्ठल विठल
भजनी ठेक्यात गावं
 
प्रा.विजय पोहनेरकर

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

World Pneumonia Day 2026 : जागतिक निमोनिया दिवस

Winter Recipe हिवाळ्यात बाजरीच्या पिठाचा पौष्टिक आणि चविष्ट शिरा कसा बनवावा?

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

पीएचडी अरेबिक मध्ये करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

पुढील लेख
Show comments