suvichar

माणूस आणि देव

Updated: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (13:44 IST)
स्वतःच्या पानात वाटयांची दाटी!
नैवेद्याला छोटी वाटी .. 
 
संकट आल्यावर देव आठवतो
नवस बोलून deal करतो ! 
अभिषेक मोठ्या थाटात करतो 
return वरती डोळा असतो !
 
सर्व करतो स्वतःसाठी 
पण देव हवा सदा पाठी ! 
देवाकडं सारख मागणं 
माणसा तुझं काय हे वागणं ??
 
शक्ती दे, युक्ती दे, बुद्धी दे, विद्या दे
नोकरी दे, घर दे, बायको दे, मुलं दे
सुख दे, समाधान दे, यश दे, कीर्ती दे 
आणि हे सारं कायम टिकू दे 
असाही देवा वर दे ! 
 
हसून देव म्हणतो,
"माणसा, 
थकलो तुला देऊन सारखा 
मागण्या मागतोस फारच मस्त
पण एवढा मी नाही स्वस्त ! 
 
मागून मागून थकत नाहीस 
थँक्यू सुद्धा म्हणत नाहीस !
भक्तीमध्ये करतोस लबाडी 
अरे चाललीये कुठे तुझी गाडी!!
 
एवढं सगळं द्यायचं म्हणतोस !
पण माझ्यासाठी काय करतोस?? 
थोडीफार आठवण काढून 
मलाच तुझी सेवा सांगतोस..!
 
अरे एकदा तरी म्हण राजा, 
देवा मला भक्ती दे 
मनी तुझे प्रेम दे
पायी तुझ्या मुक्ती दे..
 
तुझे गीत गाण्यासाठी 
कंठामध्ये सूर दे 
तुझे रूप बघण्यासाठी 
डोळ्यांमध्ये भूक दे
 
तुझा महिमा ऐकण्याची 
कानांना या आस दे 
तुझे नाम घेण्यासाठी माझा प्रत्येक श्वास दे. .! 
 
सुटो माझी आसक्ती,
लाभो मला विरक्ती
अंतकाळ साधण्याइतके
नामामध्ये प्रेम दे "
अंतकाळ साधण्याइतके
नामामध्ये प्रेम दे...

- सोशल मीडिया

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

गुडघ्यांसाठी फायदेशीर ‘जानू नमन आसन’; योग्य पद्धतीने कसे करावे? जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : जे मला प्रिय आहे

मोदक पायसम खीर: पारंपरिक आणि चवदार दक्षिण भारतीय फ्युजन रेसिपी Modak Payasam Kheer

शतदा प्रेम करावे : मंगेश पाडगांवकर मराठी कविता

केस गळतीची ७ कारणे, उपाय आणि योग्य आहार: त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला

पुढील लेख
Show comments