रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: गुरूवार, 19 मे 2022 (15:48 IST)

अजब गजब आहे हे नातं, समजायला

story
नवरा बायको च्या नात्यावर कित्ती विनोद येतात,
हसून हसून पोटात दुखतं, अनुभव कथन करतात,
सदा एकमेकांना कंटाळलेली दोघे असतात, 
कुरघोडी करायचा प्रयत्न ते करतात,
कधी बायको अशी मिळाली म्हणून वैताग नवऱ्याचा,
कधी नवरा तस्सा म्हणून शिव्यांचा भडिमार तिचा,
पण खरंच सांगा मंडळी, एकमेकां शिवाय काही आहे काय?
दोघे ही नसेल तर घरात टिकतो का पाय!
ती नसली की, घराला घरपण नसतं,
त्याच्या शिवाय घर सुरक्षित कुठं वाटतं?
तो ही अस्वस्थ असतो बायको विना,
तिची ही चिडचिड, तो समोर नसतांना,
अजब गजब आहे हे नातं, समजायला,
नवरा-बायको शिवाय अधुरा संसार, नको वाटतो जगायला!
..अश्विनी थत्ते