Dharma Sangrah
✕

बर्फाचे तट पेटूनि उठले सदन शिवाचे कोसळले... १९६२ च्या भारत चीन युद्ध पृष्ठभूमीवर लिहिलेली ही कविता आहे.

Updated: सोमवार, 22 जून 2020 (09:32 IST)
रक्त आपुल्या प्रिय आईचे 
शुभ्र हिमावर ओघळते!
 
सह्यगिरीतील वनराजांनो, 
या कुहरातुनि आज पुढे
रक्त हवे जर स्वतन्त्रतेला 
रक्ताचे पडतील सडे
एक हिमाचल राखायास्तव 
करा हिमाचल लक्ष खडे
समरपुराचे वारकरी हो, 
समरदेवता बोलविते!
रक्त आपुल्या प्रिय आईचे 
शुभ्र हिमावर ओघळते!
 
खडक काजळी घोटुनि तुमचे 
मनगट-बाहू घडलेले
कडेकपरिमधील वणवे 
उरात तुमच्या दडलेले
काबुल-कंदाहार पथावर 
डंके तुमचे झडलेले
शिवतेजाची दीपमाळ 
पाठीशी अपुल्या पाजळते!
रक्त आपुल्या प्रिय आईचे 
शुभ्र हिमावर ओघळते!
 
कोटी कोटी असतील शरीरे- 
मनगट अमुचे एक असे
कोटी कोटी देहात आजला 
एक मनीषा जगतसे
पिवळे जहरी सर्प ठेचणे 
अन्य मना व्यवधान नसे
एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो 
राहील रण हे धगधगते!
रक्त आपुल्या प्रिय आईचे 
शुभ्र हिमावर ओघळते!
 
- कुसुमाग्रज 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

यकृत निरोगी ठेवायचे आहे? आजपासूनच अवलंबवा हे १० सोपे उपाय!

अभ्यास करताना तंदुरुस्त आणि तणावमुक्त राहण्याचे हे ५ सोपे उपाय मदत करतील

मुलायम त्वचेसाठी गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच बनवा बॉडी क्रीम; त्वचेला मिळेल नैसर्गिक मऊपणा!

तुम्हाला वारंवार सर्दी होते का? हे आयुर्वेदिक उपाय करून पहा!

Baby girl names inspired by Lord Rama प्रभू श्रीराम यांच्या नावावरुन मुलींची नावे

पुढील लेख
Show comments