बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: सोमवार, 24 फेब्रुवारी 2020 (18:01 IST)

प्रेम म्हणजे.....

स्नेह-प्रेमाचा हा प्रकार आपण आपल्याहून वयाने लहान असणार्‍या व्यक्तीसोबत ठेवतो. यात एक काळजी किंवा माया असते. भूतदया किंवा पशुपक्ष्यांबद्दल वाटणारी आपुलकी हीसुद्धा यात मोडते. प्रेम- हा समान वोगटातील व्यक्तींचा दरम्यान असणार्‍या संबंधांना दर्शवितो- याचे उपप्रकार म्हणजे पत्नीप्रेम, भगिनीप्रेम, बंधुप्रेम, मित्रप्रेम इत्यादी. आदर- हा प्रेमाचाच प्रकार... आपल्याहून वयाने मोठ्या अथवा ज्येष्ठ व्यक्तींकरिता असतो. यातही संबंधित व्यक्तीची वाटणारी काळजी- विशेषतः त्यांच्या आवडी-निवडी व विचारांचा आपण ठेवतो. ही वागणूक त्यांच्या जीवनाच्या अनुभवाची आणि त्यांनी आपल्या  केलेल्या संगोपनाबद्दलची एक पावती आणि क्वचित प्रसंगी त्यांना आवडणार्‍या शिस्तबद्ध दिनचर्येची दखल असू शकते. पण हे सर्व प्रेमच!
 
ममता - हा तो प्रेम प्रकार की ज्याल अनुभवाला असे म्हणतात की देवही अवतार घेतात. स्त्रीला मातृत्व प्राप्त झाले की आपल्या बाळासाठी वाटणारे
प्रेम म्हणजे ममता होय. भक्ती - प्रेमाचे परोमच्च रूप की ज्याचे वर्णन केवळ अशक्य. परेश्वर आणि साधक जेव्हा एकरूप होतात तेव्हा जो प्रेमप्रकार
घडतो तो म्हणजे भक्ती. भक्ती म्हणजेच एकरूपता. भिन्नता म्हणजे विभक्ती - परेश्वर आणि भक्त दोघेही एकरूप होऊन आपापले वेगळे अस्तित्व घालवून परोमच्च एकरूपता अनुभवतात त्यासच भक्ती असे संबोधन आहे.
 
हे शिकवले भारताने जगाला! नुसतेच लव्ह लव्ह म्हणतात बापडे. पण त्यांना प्रेमाची व्याख्‍याही नुसती कळते. वासनेला प्रेम सजून इतर प्रेम प्रकाराकडे
संपूर्ण दुर्लक्ष करणार्‍या समाजाला प्रगल्भ किंवा सुसंस्कृत म्हणायचे की भारताला?
 
प्रेम म्हणजे... समजली तर भावना, ठेवला तर विश्र्वास, मांडला तर खेळ आणि निभावलं तर जीवन...
कवी कुसुमाग्रजांच्या कवितेनेतर सारेच प्रेमाचे सार सांगितले..
पुरे प्रेम म्हणजे काय असतं.......
काय असतं.
जे चंद्राला चांदणंशी असतं,
इंद्रधनुषला क्षितिजाशी असतं,
सळसळणार्‍या वारला गर्जणार्‍या  
ढगांशी असतं
प्रेम म्हणजे काय असतं.
प्रेम म्हणजे......॥ जे फुलपाखराला फुलाशी असतं,
काजवला घनदाट अंधाराशी असतं,
गुणगुणणार्‍या पतंगाला मिणमिणात्या दिव्याशी असतं
प्रेम म्हणजे काय असतं,
जसं सुखाला दुःखाशी असतं,
हसण्याला रडण्याशी असतं,
रात्रीच्या अंधाराला सकाळच्या उजेडाशी असतं.
प्रेम म्हणजे काय असतं.
जे हळुवार जपायाचं असतं,
हृदयात साठवून ठेवाचं असतं,
कितीही दुःख झालं तरी हसत जगायचं असतं,
प्रेम म्हणजे काय असतं.
जे फक्त शेवटपर्यंत  
तिच्यात आणि आपल्यात असतं
त्याच्या आणि आपल्यात असत..
आपल्यातला भाव दुसर्‍याशी एकरूप करणं म्हणजे प्रेम. आपलं नातं घट्ट टिकून राहावं यासाठी केलेला प्रयत्न म्हणजेच प्रेम आणि समोरच्या माणसाला आपण काहीतरी सतत देत राहणं म्हणजेच प्रेम. या प्रेमाला कुठलीच उपमा देता येणार नाही कारण प्रेम हे देवाची देण असते. त्यामुळे आपल नात एखाद्याबद्दल प्रेम निर्मार होणे हे सुद्धा तितकंसं सोपं नाही. म्हणूनच आपण जगावरती प्रेम करावं म्हणजे आपल्यालाही समोरून फक्त आणि फक्त प्रेमच मिळू शकते, हे त्रिवार सत्य आहे. 
 
प्रेमामुळे युद्ध टळू शकते. प्रेमामुळे अनेक राज्ये जगू शकतात. प्रेमामुळे ती टिकू शकतात .आणि प्रेमामुळेच ती वाढूही शकतात. म्हणूनच द्वेष हा बाजूला ठेवून सगळ्यांवर सतत प्रेम करत राहणं म्हणजेच जीवन जगणं होय ..आणि असे जीवन जगणे तर मुक्तीचे द्वार....। 
विठ्ठल जोशी