शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 (09:53 IST)

‘रात्रीस खेळ चाले’ आता And टीव्ही वाहिनीवर

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसेच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. मुख्य म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले २’ मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. या मालिकेची लोकप्रियता पाहता हिच मालिका हिंदीमध्ये पाहायला मिळणार असून ही मालिका हिंदीमध्ये डब करण्यात आली आहे. या मालिकेचे नाव ‘रात का खेल है सारा’, असे ठेवण्यात आले आहे. And टीव्ही वाहिनीवर ही मालिका पाहायला मिळणार असून २९ फेब्रुवारीला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला असून या मालिकेतील टायल ट्रॅकला रसिकांची भरघोस पसंती मिळत आहे. यावरुन मालिकेला मराठीप्रमाणे हिंदीतही रसिकांची पसंती मिळवण्यात यशस्वी ठरेल असा विश्वास मालिकेच्या टीमने व्यक्त केला आहे.