Dharma Sangrah
✕

मराठीही फारशी सोपी नाही..

Updated: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (12:29 IST)
१०. त्याने " सही " ची अगदी " सही सही " नक्कल केली.
११. " वर " पक्षाची खोली " वर " आहे.
१२. खोबर्‍यातला मुलांचा " वाटा " देऊन मग बाकीच्याची चटणी " वाटा ".
१३. " विधान " सभेतील मंत्र्यांचे " विधान " चांगलेच गाजले.
१४. फाटलेला शर्ट " शिवत " नाही तोपर्यंत मी त्याला " शिवत " नाही.
१५. भटजी म्हणाले, " करा " हातात घेऊन विधी सुरू " करा ".
१६. धार्मिक " विधी " करायला कोणताही " विधी " निषेध नसावा.
१७. अभियंता  म्हणाला, इथे "बांध  बांध"
१८. उधळलेला " वळू " थबकला, मनात म्हणाला, इकडे " वळू " कि तिकडे " वळू ".
१९. कामासाठी भिजवलेली " वाळू " उन्हाने " वाळू " लागली.
२०. दरवर्षी नवा प्राणी " पाळत " निसर्गाशी बांधिलकी " पाळत " असतो.
२१. फुलांच्या " माळा " केसांत " माळा ".
 
मराठीची अवखळ वळणे....
ज्यांना तोंडावर "बोलून टाकणं" जमत नाही ते पाठीमागे "टाकून बोलत" राहतात. 
शहाणा माणूस "पाहून हसतो", निर्मळ माणूस "हसून पाहतो".
काम सोपं असेल तर ते आपण "करून पाहतो", अवघड असेल तर "पाहून करतो"
एकजण "लिहून बघतो" तर दुसरा "बघून लिहितो"
ही अशी सुंदर, लवचीक, अवखळ मराठी
 
आता हेच बघा ना,
एखाद्याचा सत्कार करताना आपण देतो श्रीफळ, तर हकालपट्टी करताना देतो नारळ!!
 
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
 
 
- सोशल मीडिया

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

करवा चौथ 2026: करवा चौथला पत्नीला द्या खास सरप्राईज; या रोमँटिक कल्पनांनी बनवा तिचा दिवस अविस्मरणीय

पंचतंत्र : मूर्ख राजा आणि बुद्धिमान माकडाची गोष्ट

चकली भाजणी घरी बनवताना कोणते प्रमाण ठेवावे? कुरकुरीत चकलीसाठी महत्त्वाच्या टिप्स

Vasubaras 2026 Wishes in Marathi वसुबारस शुभेच्छा संदेश मराठी

अमावस्येच्या रात्री शारीरिक संबंध ठेवू नयेत, असे का म्हटले जाते?

पुढील लेख
Show comments