मराठी कविता : अपेक्षा असते अशी बऱ्याच जणांनी
आपल्या साठी कुणीही काहीतरी करावं,
जिथं गरज असेल, तिथं कामी कुणी पडावं,
अपेक्षा असते अशी बऱ्याच जणांनी,
स्वतः ला मात्र जाणीव ही नसते, आपल्या कर्तव्याची,
एक प्रश त्यांनी मनास हाही विचारावा,
आपण कधी कामी पडतो इतरांच्या,याचा विचार व्हावा!
फक्त घेणं घेणं कसं होईल बरं स्वतःस,
कधी कधी आपल्यास ही द्यावं लागतं इतरांस,
तेव्हाच मिळतो निर्भेळ आनंद काही केल्याचा,
समाधान दिसतं चेहेऱ्यावर, आनंद माणूस असण्याचा!!
...अश्विनी थत्ते