बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Updated : शुक्रवार, 26 मे 2023 (16:00 IST)

Marathi Kavita खळखळ नद्या अवखळ वाहत, सोबत करतात.

घरातून बाहेर पडलो की दिसते अद्भुत दुनिया,
निसर्गाचा चमत्कार, अन त्याची सारी किमया.
कुठं उंच डोंगर वाटेत सोबतीला असतात,
खळखळ नद्या अवखळ वाहत, सोबत करतात.
बर्फाचे पहाड शुभ्र शाल पांघरून दिसतात साधू सम,
अंगावर त्यांच्या रात्री रोज वर्षाव करतो हींम.
हिरवी कुरणे डोलतात, रानफुला सोबत,
गायी गुर चरतात त्यावर, खात कोवळे गवत.
पक्षांचा किलबिलाट  जिवा वेड लावतो,
झुळझुळ वारा, मंद मंद गीत नवे गातो.
असा हा रम्य निसर्ग मज सदाच बोलावी,
रम्य अशी सहल त्याच्यासवे माझी नेहमीच व्हावी!
..अश्विनी थत्ते.