1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मे 2023 (18:43 IST)

Marathi Kavita बाई ची पर्स, म्हणजे गुहा अलिबाबा ची!

purse
बाई ची पर्स, म्हणजे  गुहा अलिबाबा ची!
खांद्यावर लटकणारी एक पोतडी जादूची.
काय काय असतं त्या पोतडीत सांगून नाही पटणार,
पण वेळ आली की त्यातलं पटकन काही नाही मिळणार!
कप्पेच कप्पे आत सर्व जग जाऊन बसत,
घरातील अर्ध समान त्यात सामावलेलं असतं,
जिचं तिला च गवसतं, त्यात दडलेलं,
 गरजेचं पण असतं  त्यात असलेलं.
प्रवासात तर हमखास त्यावर हक्क सर्वांचा,
आहोनी दिलेलं सर्व काही त्यात ठेवायचा.
पण गुणांची असते हो ही पर्स बिचारी,
मुकाट सहन करते, अत्याचार  सारी,
आमची जिवाभावाची ही सखी आम्हास प्रिय अती,
सर्वच वेळेस असते ती आमची खरी सोबती!!
...अश्विनी थत्ते.