शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जुलै 2024 (20:33 IST)

इतके मला पुरे आहे

इतके मला पुरे आहे
बसायला आराम खुर्ची आहे 
हातामध्ये पुस्तक आहे 
डोळ्यावर चष्मा आहे 
इतके मला पुरे आहे  ।।१।।
 
निसर्गामध्ये सौंदर्य आहे 
निळे आकाश आहे 
हिरवी झाडी आहे 
सूर्योदय, पाऊस, इंद्रधनुष्य आहे 
इतके मला पुरे आहे ।।२।।
 
जगामध्ये संगीत आहे 
स्वरांचे कलाकार आहेत 
कानाला सुरांची जाण आहे 
इतके मला पुरे आहे ।।३।।
 
बागांमध्ये फुले आहेत 
फुलांना सुवास आहे 
तो घ्यायला श्वास आहे 
इतके मला पुरे आहे ।।४।।
 
साधे चवदार जेवण आहे 
सुमधुर फळे आहेत 
ती चाखायला रसना आहे 
इतके मला पुरे आहे ।।५।।
 
जवळचे नातेवाईक आहेत 
मोबाईलवर संपर्कात आहेत 
कधीतरी भेटत आहेत 
इतके मला पुरे आहे ।।६।।
 
डोक्यावरती छत आहे 
कष्टाचे दोन पैसे आहेत 
दोन वेळा दोन घास आहेत 
इतके मला पुरे आहे ।।७।।
 
देहामध्ये प्राण आहे 
चालायला त्राण आहे 
शांत झोप लागत आहे 
इतके मला पुरे आहे ।।८।।
 
याहून जास्त आपल्याला काय हवे आहे ?
जगातील चांगले घेण्याचा,
आनंदी आशावादी राहण्याचा
विवेक हवा आहे !!!
इतके मला पुरे आहे ।।९।।
 
विधात्याचे स्मरण आहे 
प्रार्थनेत मनःशांती आहे 
परमेश्वराची कृपा आहे 
इतके मला पुरे आहे ।।१०।।
 
- सोशल मीडिया