सोमवार, 7 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: सोमवार, 26 जून 2023 (15:05 IST)

Marathi Poem : वाईटा स द्यावी तिलांजली, त्यापासून दूर पळाव !

सवय एक अशी गोष्ट, की त्याचा गुलाम होतो व्यक्ती,
त्या सवयी शिवाय, संपूर्ण असते त्याची अभिव्यक्ती,
जिथं जिथं तो जातो, घेऊन जातो सवयीला,
कितीही नाही म्हटलं तरीही तीच असते सोबतीला,
दोन प्रकार असतात न त्यात!वाईट अन चांगली,
कळतंच नाही आपल्याला ती कशी काय लागली!
वाईट सवयी आयुष्य उध्वस्त करतात, उठवतात त्यातून,
चांगल्या सवयी तारून नेतात, निखरतं आयुष्य सोन होऊन,
करता करता वाईट सवयीची गुलामी, बुद्धी भ्रष्ट होतें,
आपल्या साठी सवयी की सवयी करता आपण, व्याख्या कठीण होते,
म्हणून चांगलं करायला शिकावं, ते अंगिकाराव,
वाईटा स द्यावी तिलांजली, त्यापासून दूर पळाव !
..अश्विनी थत्ते.