बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Updated : शनिवार, 24 जून 2023 (16:32 IST)

धरित्री ही आमची राणी, दिसेल हिरवी साजिरी!

rain poem
यायचं होतं तुलाही, पण कोंडून  होता ठेवला,
शिक्षा तुला ही झाली की रे, काय गुन्हा केला?
करत कोण अन भरत कोण!अशी ही स्थिती,
आटोक्या बाहेर चाललीय, ही सर्व परिस्थिती,
पण आलास आहे बाबा, तर जरा हुश्श कर,
दमाने घे अन निवांत थांबून पड इथं पावसाळ्या भर,
खेळ उन्हासंग पाठशिवणीचा खेळ, नाही कोण म्हणतं?
फिर ना रानी वनी , कोण तुला आडवत!
लाव हुरहूर प्रेमी जीवांना, मग मिठी मार,
तुही प्रेमात पड ना!प्रेमात नको खाऊस हार!
साचव टपोरे थेंब, नदी नाल्यात तुझे,
भरतील सरोवरे अन धरतीवर होईल फुलापाना चे ओझे,
हिरवाई दिसेल सर्वत्र, बळीराजा ही होईल आनंदी,
पिकेल पिकं शेतात, सणासुदीला चांदी,
वरुण राजा आहेस तू  वाग ना राजापरी ,
धरित्री ही आमची राणी, दिसेल हिरवी साजिरी!
..अश्विनी थत्ते.