गुरूवार, 2 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. फादर्स डे
Written By
Last Updated : रविवार, 18 जून 2023 (23:36 IST)

Father 's Day वडिलांसाठी ची हृदयातील जागा राखून ठेवावी

fathers day
वडिलांसाठी ची हृदयातील जागा राखून ठेवावी,
गरज नाहीय सर्वांसमोर महती जाहीर करावी,
ते ही जगतात की पूर्ण आयुष्य, मोठेपणा न दाखवता,
हात पाय मारत पूर्ण करतात सर्व, चेहेऱ्यावर न येऊ देता,
कुठून कधी कर्ज काढतात, कधी उधार घेतात,
पण येणारा प्रसंग साजरा मात्र करतात,
कधी हौशे खातर, कधी औषध पाण्याला,
नाही नाही म्हणत, तयार असतात खर्चाला,
खिशात कधी कधी दमडी ही नसेल , माहिती नाही,
पण डोळ्यात त्यांच्या अगतिकता बघितली नाही,
असा दमदार व्यक्ती फक्त वडीलच असू शकतात,
त्यांना गरज नाही प्रसिद्धी ची,ते त्या पलीकडचे असतात!!
...अश्विनी थत्ते.