आयुष्य कठीण अजिबात नसतं...

life
Last Updated: शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (13:30 IST)
आयुष्य कठीण अजिबात नसतं...

कधी नळाला पाणी नसतं...
कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं...

कधी पगार झालेला नसतो...
कधी झालेला पगार उरलेला नसतो..
कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो...

कधी जागा नसते...
कधी जागा असून स्पेस नसते...
कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची उब नसते...

कधी डब्यात आवडती भाजी नसते...
कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते...
दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते...
कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो...
कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या -भारावल्या सारखे वाटते...

कधी काही शब्द कानावर पडतात...
कधी नको ते शब्द कानावर आदळतात...

कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते
आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात...

कधी आपण कसे वागायचे समजत नाही...
कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही...

कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही...
कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही...

कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही...
कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही...

कधी कोठे रिजिड आणि कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही...
कधी समोरचा /ची आपल्याला अकारण हक्काचा /ची वाटू लागते...
कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो...

कधी पैसा असला की नात्यांचा मोह होतो
आणि नाती असली की त्यांच्या गरजा -मौज पूर्ण करता येत नाहीत म्हणून जीव हिरमुसतो...
ताण घेतला तर तणाव...
आजचे भागले म्हणून आनंद
आणि उद्याच काय म्हणून चिंता
आयुष्य कठीण करते...

आपण नदी सारखं जगावं...
सतत वहात राहाव.......
या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावं..

- सोशल मीडिया


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

Diabetes: मधुमेहामुळे शरीराचे हे अवयव खराब होऊ शकतात, अशा ...

Diabetes: मधुमेहामुळे शरीराचे हे अवयव खराब होऊ शकतात, अशा प्रकारे संरक्षण करा
बहुतेक लोकांना मधुमेहासारखा आजार होत आहे, ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करत आहेत, परंतु ...

मंकीपॉक्सचा मुलांना अधिक धोका

मंकीपॉक्सचा मुलांना अधिक धोका
यूके आणि इतर काही देशांमध्ये मांकीपॉक्सची प्रकरणे सतत वाढत आहेत, जरी भारतात आतापर्यंत ...

मुलीला इम्प्रेस करण्यासाठी खास टिप्स

मुलीला इम्प्रेस करण्यासाठी खास टिप्स
प्रत्येक तरुण मुलाला एक छान, सुंदर मैत्रीण हवी असते. प्रत्येकाची अशी इच्छा असली तरी काही ...

Easy Recipe Paneer Kolhapuri पनीर कोल्हापुरी सोपी रेसिपी

Easy Recipe Paneer Kolhapuri पनीर कोल्हापुरी सोपी रेसिपी
कधी कधी आपल्याला काहीतरी चटपटीत आणि चटपटीत खावेसे वाटते. अशा प्रकारे तुम्ही वीकेंड स्पेशल ...

Parenting Tips: तुमचं मुलं बिघडत आहे का, या लक्षणांनी ओळखा

Parenting Tips: तुमचं मुलं बिघडत आहे का, या लक्षणांनी ओळखा
पालकांना आपल्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची असते. मुलांच्या आनंदासाठी तो सर्व ...